उद्या पासुन डोंबिवलीतील बंदीस्त क्रीडा संकुलात सुरु होणार सर्व सुविधांनि युक्त असे डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर
डोंबिवली : Iकल्याण डोंबीवली महानगर पालिका क्षेत्रातील वाढत्या कोरोना रुग्णांचा विचार करता पालिकेने डोंबिवली येथील सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त क्रीडा संकुलात नवीन डेलीकेडेड हेल्थ सेंटरची निर्मिती केली आहे हे अद्ययावत हेल्थ सेंटर उद्यापासून कोरोना रुग्णांच्या सेवे साठी खुले होत आहे . ही कल्याण डोंबिवलीकरांसाठी दिलासादायक बाब आहे .
उद्यापासून सावळाराम क्रिडा संकुल येथील सर्व सुविधायुक्त डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर सुविधा सुरू होत असल्याची घोषणा खासदार श्रीकांत शिंदे यांनी सदर सेंटरची पहाणी केल्यानंतर केली .
महापालिका क्षेञातील रूग्णाची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना अधिक चांगले उपचार देण्याच्या दृष्टीकोनातुन सावळाराम क्रिडा संकुल डोंबिवली येथे ३० बेडचे आयसीयु असलेले व १५५ ऑक्सीजन बेडसचे डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर कार्यान्वित होणार असून त्याची पाहणी खासदार डॉ .श्रीकांत शिंदे , महापौर विनिता राणे, तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी ( देवनपल्ली ), उपायुक्त मिलींद धाट व इतर अधिकारी वर्ग यांनी केली, त्यावेळी मा.खासदारांनी हे प्रतिपादन केले.
सावळाराम क्रिडा संकुलाप्रमाणेच डोंबिवली जिमखाना , टेनिस कोर्ट , पाटीदार हॉल तसेच कल्याण मधील आर्ट गॅलरी व आसरा स्कुल येथे सुमारे १००० बेड ची सुविधा महापालिका, कोव्हिड १९ रुग्णांसाठी साठी करीत आहे, अशी माहिती खासदार यांनी यावेळी दिली.
शास्ञीनगर रूग्णालयावरती प्रचंड ताण असून सावळाराम क्रिडा संकुलातील डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर कार्यान्वित होत असल्यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. गेल्या काही दिवसात संशयीत रुग्णांच्या चाचण्या वाढवल्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परंतू लोकांनी त्यासाठी घाबरून जावू नये, असे आवाहन पालिका आयुक्त डॉ . विजय सुर्यवंशी यांनी यावेळी केले.
ह.भ. प. सावळाराम क्रिडा संकुलातील सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त क्रिडागृहात सुमारे चौदा हजार स्वेअर फुट जागेत सर्वसुविधा युक्त १५५ बेड ऑस्किजन व ३० बेड आयसीयु चे डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर उदयापासून सुरू होत असून यामध्ये १० व्हेटिंलेटर्सची व १५ बायपॅप ची देखील सोय करण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी कंफर्ट कुलींगची सुविधा असून रूग्णांचा ताण हलका व्हावा यासाठी संगीत सुरावटीची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलेआहे.
500 total views, 2 views today