लॉकडाऊन काळात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवणाऱ्या भाजी विक्रेत्या विरोधात पालिकेसह पोलिसांची कारवाई

आय प्रभागक्षेत्र अधिकारी व त्यांचे फेरीवाला पथक तसेच मानपाडा पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक दादाहरी चौरे यांनी त्यांचे पथकासह संयुक्त कारवाई करुन भाजी विक्रेत्यांचे  ६ टेम्पो जप्त केले, महापालिकेच्या २ वाहनांद्वारेदेखील संबंधितांचा भाजीपाला जमा करण्यात आला. 

कल्याण : सध्याचे लॉकडाउनच्या काळात देखील वारंवार सूचना देवूनही भाजी विक्रेते सोशल डिस्टन्सिंग न पाळता विना परवानगी भाजी विक्री करीत असल्याचे दिसून येत असल्यामुळे त्यांचे विरुध्द कठोर कारवाई करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे
आज पहाटे कल्याण शिळ रोड वरील टाटा नाका येथे काही भाजी विक्रेते सुरक्षितेचे नियम न पाळता, आढळून आल्याने संबंधीत भाजी विक्रेत्यांना समज देवूनही सुधारणा न झाल्यामुळे आय प्रभागक्षेत्र अधिकारी व त्यांचे फेरीवाला पथक तसेच मानपाडा पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक दादाहरी चौरे यांनी त्यांचे पथकासह संयुक्त कारवाई करुन भाजी विक्रेत्यांचे  ६ टेम्पो जप्त केले, महापालिकेच्या २ वाहनांद्वारेदेखील संबंधितांचा भाजीपाला जमा करण्यात आला. संबंधित भाजी विक्रेत्यांविरुध्द भा.दं.वि. १८८, २६९, २७० राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००६ च्या कलम ५१ व तसेच कोविड-१९ उपाययोजना २०२० चे कलम११ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यांत आलेले आहेत.

 537 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.