कोरोना: राज्यात सर्वाधिक ऍक्टिव्ह रूग्ण ठाणे जिल्ह्यात, मुंबईतील संख्या घटली


६५५५ नवे रूग्ण, ३६५८ बरे होवून घरी तर १५१ जणांच्या मृत्यूची नोंद

ठाणे : ठाणे जिल्हा आणि आसपासच्या परिसरात वाढत असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे या भागातील संख्या राज्यात सर्वाधिक झाली आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या २८ हजार ५०८ अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या तर मुंबईतील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या२३ हजार ७३२ इतकी झाली आहे. तर ३ ऱ्या क्रमांकावर पुणे जिल्ह्याची संख्या असून येथे १३ हजार ८६४ वर पोहोचली आहे. मागील २४ तासात ६५५५ नव्या रूग्णांचे निदान झाले आहे. तर ३६५८ रूग्ण बरे होवून घरी गेले असून १५१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख ६ हजार ६१९ वर पोहोचली आहे. तर १ लाख ११ हजार ७४० रूग्ण आतापर्यत बरे होवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.०८ % एवढे झाले आहे. राज्यात आज १५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११,१२,४४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,०६,६१९ ( १८.५७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,०४,४६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४६,०६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.

 389 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.