कल्याण पंचायत समितीत शिवसेना भाजपा युतीचा झेंडा

भाजपाकडून शिवसेनेच्या दोन सदस्यांना फोडत त्यांच्याच गळ्यात सभापती उपसभापती पदाची माळ घालण्यात आल्याने नक्की कोणी कोणाचा गेम केला हीच चर्चा बरसणाऱ्या पावसाबरोबर कल्याणात रंगली होती.

कल्याण : कल्याण पंचायत समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीला बाजूला सारत चक्क भाजपची हातमिळवणी करत सत्ता स्थापन केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या .संतप्त राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी उघडपने आपली नाराजी व्यक्त केली तर पंचायत समितीत सत्ता हातात ठेवण्यासाठी भाजपाकडून शिवसेनेच्या दोन सदस्यांना फोडत त्यांच्याच गळ्यात सभापती उपसभापती पदाची माळ घालण्यात आल्याने नक्की कोणी कोणाचा गेम केला हीच चर्चा बरसणाऱ्या पावसाबरोबर कल्याणात रंगली होती.
कल्याण पंचायत समितीत भाजपचे ५ , शिवसेना ४ , राष्ट्रवादी कॉंग्रेस ३असे पक्षीय बलाबल असून १२ सदस्यामधून सभापती आणि उपसभापती पदाची आज निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी शिवसेना राष्ट्रवादीची युती करत राज्यातील आणि जिल्ह्यातील सत्तेचा कित्ता गिरवले अशी शक्यता होती . राष्ट्रवादीला सभापती आणि उपसभापती पद देण्याचे आश्वासन युतीकडून देण्यात आल्याने भरत भोईर यांनी सभापती पदासाठी तर राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला यावेळी राष्ट्रवादीचे ३ आणि शिवसेनेचे भरत भोईर आणि किरण ठोंबरे हे दोन सदस्य उपस्थित होते. मात्र सेनेचे दोन सदस्य गायब असल्यामुळे गोंधळाचे वातावरण होते . मात्र अचानक शिवसेनेचे सदस्य असलेल्या अनिता वाकचौरे आणि रमेश बांगर यांनी भाजपच्या ५ सदस्या बरोबर पंचायत समिती निवडणूक कार्यालयात प्रवेश करताच सत्तेचे गणित उलटल्याचे राष्ट्रवादीच्या सदस्याच्या लक्षात आले. भाजपाच्या मदतीने सेनेच्या अनिता वाकचौरे यांनी सभापती पदासाठी तर रमेश बांगर यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला. या दोघानाही प्रत्येकी ७ मते मिळाल्यामुळे त्यांचा सत्तेचा मार्ग सुकर झाला. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक आकडे यांनी सभापती उपसभापती पदाच्या नावावर शिक्का मोर्तब केले. तर राष्ट्रवादीला मात्र सत्तेपासून दूर राहावे लागले. भाजपाच्या दिग्गजांनी सत्तेत राहण्यासाठी हि खेळी केल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली असली होती

 429 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.