धक्कादायक…रत्नागिरीतील कोविड तपासणी लॅब केव्हाही होऊ शकते बंद


कोविड व्हायरस टेस्टिंग किटचा शासकीय रुग्णालयातील साठा संपण्याच्या मार्गावर

शासकिय रुग्णालयाने राज्याचे आरोग्य सचिव आणि जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून दिली माहिती

रत्नागिरी: रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील कोविड टेस्टिंग साठी स्वब तपासणी साठी लागणारे किट संपण्याच्या मार्गावर असून ही लॅब केव्हाही बंद पडू शकते याचा शासकीय रुग्णालयातील साठा संपुष्टात आलेले असून याचा  वेळेवर पुरवठा केला नाही तर ही लॅब बंद राहील असे पत्र जिल्हा आरोग्य सचिव आणि  जिल्हाधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्य अधिकारी यांच्यापर्यंत पाठवल्या चे खात्रीशीर वृत्त आहे
  तीन जून पर्यंत अद्याप याबाबत काहीच निर्णय झालेला नाही ६६ लाख ५९ हजार ७७७ हजार रुपयांची  तांत्रिक मान्यता मिळालेली असून ई टेंडर काढण्यात आलेलं आहे त्याला
टेंडर प्रक्रियेला अजून बारा दिवस जातील त्यामुळे तात्काळ पुरवठा होणे आवश्यक असल्याचे या पत्रात नमूद केलेले आहे तसेच २३ जून २०२० रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एनएचएम विभागाकडे प्रस्ताव तोंडी सादर करायला सांगितले होते परंतु आजपर्यंत त्याच्यावर काहीच कारवाई झाली नसल्याचे असे या पत्रात म्हटले आहे
  याबाबत  राज्यांचे आरोग्य सचिव काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे

 545 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.