अखेर टीकेमुळे आयसीएमआर करणार कोरोनावरील देशी औषधाची ट्रायल

व्यक्तीबरोबर प्राण्यांवरही चाचणी करून लवकरच बाजारात आणणार

नवी दिल्ली-मुंबई : परदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येला मागे टाकत भारताने कधीच २ रा क्रमांक पटकावला. तरीही आयसीएमआर कडून कोरोनावरील देशी बनावटीच्या औषधाची ट्रायल करण्यासाठी मुहूर्त अर्थात १५ ऑगस्टपर्यतचा मुहुर्त शोधला. परंतु या धोरणावर देशातील सर्वस्तरातून टीकेची झोड उठताच अखेर आयसीएमआरने लवकरच कोरोनावरील औषधाची ट्रायल सुरु करणार असल्याचे जाहीर केले.
देशातील कोरोनाबाधीतांच्या संख्येने ६ लाखाचा आकडा पार केला. तसेच हजारो नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होत असला तरी परदेशातील रेमडेसिवीर, प्लारावीर यासह अनेक औषधांच्या वापरास देशात मान्यता देण्याचे काम आयसीएमआरकडून फक्त सुरु आहे. मात्र देशात भारत बायोटेक कंपनी- आयसीएमआरने तयार केलेल्या भारताच्या कोरोनावरील औषधाला प्रमाणित करण्यासाठी देशातील व्यक्ती आणि प्राण्यांवर चाचणी अर्थात ट्रायल करण्यासाठी मुहूर्त शोधत होती. त्यातच या मुहूर्ताला राजकिय किनार देण्यात येत असल्याचा आरोप सर्वचस्तरातून करण्यात येवू लागला.
त्यामुळे अखेर आयसीएमआरने याबाबच प्रसिध्दी पत्रक काढून या औषधाची चाचणी लवकरातलवकर रूग्ण आणि जनावरांवर सुरु करून त्यास प्रमाणित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच ही ट्रायल दोन टप्प्यात घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आपादकालीन परिस्थितीचे संधीत रूपांतर करण्याची भूमिका जाहीर केली. तसेच या कालावधीत आत्मनिर्भरतेचा नाराही दिला. मात्र कोरोनावरील औषध देशात तयार करूनही त्याची प्रमाणितता तपासणीसाठी आयसीएमआरला वेळ मिळू नये याबाबत आश्चर्य आहे. बाकिच्या देशात इतर कोणाचा विचार न करता सर्वात आधी कोरोनावरील औषध कसे तयार करून त्याचा लाभ आपल्याच देशातील नागरिकांना करून देवून जनतेचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र भारताच्या आयसीएमआरला मात्र ट्रायल घेण्यासाठी मुहूर्ताचा शोध आणि राजकिय किनार बघत बसावे लागते. यावरून आपण किती आत्मनिर्भर होणार हे स्पष्ट दिसत आहे.

 587 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.