पूर टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील पाणीप्रश्नी कर्नाटकच्या मंत्र्याशी चर्चा

७ जुलै रोजी दोन्ही राज्यांचे जलसंपदा मंत्री भेटणार

मुंबई : मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील काही भागात असलेल्या नदीला पूर येवून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच अलमट्टी धरणातील पाणी सोडण्याबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा करण्यात आली नव्हती. त्यामुळे यंदाही अशी परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे कर्नाटकचे जलसंपदा मंत्र्यांची चर्चा होणार असल्याची माहिती जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराची कारणे शोधण्यासाठी वडनेरे समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीन अभ्यास करून अशा पध्दतीचा पुर टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत नियोजन करावे असा महत्वपूर्ण सूचना केली होती. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने या धरणातून पाण्याच्या करावयाच्या विसर्गाबाबत कर्नाटकशी चर्चा करणे गरजेचे आहे. त्यानुसार ही चर्चा करण्यात येणार असून अलमट्टीच्या पाण्यामुळे कर्नाटकातही पुरपरिस्थिती निर्माण होवू शकते. त्यामुळे पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

 476 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.