ठाणे शहर राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे उपाध्यक्ष संतोष साटम यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
ठाणे : शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता काॅंरटाइन सेंटर कमी पडण्याची शक्यता आहे त्यासाठी ठाणे शहरातील मॉलचा वापर ठाणे महापालिका करू शकते. कोरम माॅल,विवियाना माॅल, हायपरसीटी माॅल असे बरेचसे मोठे माॅल सध्या बंदच आहेत त्याचा वापर ठामपा का करत नाही ? त्यांच्या पार्किंगमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात जागा आहे तसेच तेथे काॅरंटाइन सेंटर उभारण्यास जास्त पैसे पण खर्च होणार नाहीत. त्यामुळे ठामपाच्या जेणेकरून ठाणेकरांच्या पैशाची बचत सुद्धा होईल तरी आपण याचा विचार करावा व माॅलच्या पार्किंग जागेत काॅरंटाइन सेंटर उभारण्यात यावेत अशी विनंती राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे ठाणे शहर उपाध्यक्ष संतोष साटम पालिका आयुक्त विपिन वर्मा यांना केली आहे.
999 total views, 1 views today