भाजपच्या कार्यकारिणीवर फडणवीसांची छाप


‘अडगळीत’ गेलेल्या नेत्यांना मिळाली ही पदे
मुंबई : भारतीय जनता पक्षाची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या भाधव भंडारी यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांच्या सोबतीला १२ उपाध्यक्ष नेमण्यात आले आहेत. पाच जणांची महामंत्रिपदी वर्णी लागली आहे.
भाजपच्या राज्यातल्या कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पक्षामध्ये साईडलाईनला गेलेल्या नेत्यांचे भाजपने पुनर्वसन केले आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलेले चंद्रशेखर बावनकुळे यांना सरचिटणीस हे पद देण्यात आले आहे. तर पंकजा मुंडे यांना केंद्रात जबाबदारी दिली जाणार आहे. तसेच त्या राज्याच्या कोअर कमिटीतही असतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. विनोद तावडे, प्रकाश मेहता तसेच एकनाथ खडसे यांना राज्य कार्यकारिणीत केवळ निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. अशा या नेत्यांना केंद्रात आणण्याचा विचार केंद्रीय नेतृत्वाकडून सुरु असल्याचे बोलले जात आहे. पंरतु, संघटनेत वकुब असलेल्या तावडेंना मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. राज्य अथवा केंद्रात पक्षाकडून सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचे पूर्ण निष्ठेने पालन करून. तूर्त केंद्रीय कार्यकारिणीत जबाबदारी देण्यासंबंधी राज्यातील तसेच केंद्रातील कुठल्याही नेत्यांसोबत चर्चा झाली नाही, असे मत विनोद तावडे यांनी व्यक्त केले.
पंकजा मुंडेंना लवकरच केंद्रात जागा मिळणार
पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची घोषणा शुक्रवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. केंद्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी पंकजा मुंडेंना दिली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. विधानसभेत मुख्य प्रतोद हे आशिष शेलार, माधुरी मिसाळ असतील असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र सर्वात महत्त्वाची घोषणा त्यांनी केली ती ही की पंकजा मुंडे यांना केंद्रीय कार्यकारिणीत मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते म्हणून केशव उपाध्येंना जबाबदारी दिल्याचेही त्यांनी जाहीर केले.
पंकजा मुंडेंना केंद्रात कार्यकारिणीत चांगली जबाबदारी मिळेल, कोअर कमिटीच्या सदस्या त्या १०० टक्के असतील. केंद्रातली जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी भूमिका त्यांची असेल असे चंद्रकांत पाटील यांनी परिषदेत जाहीर केले. प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे या दोन वेगळ्या खासदार आहेत त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे नाराज आहेत म्हणून त्यांना ही जबाबदारी दिली असे काहीही नाही. आमच्या पक्षात कुणीही नाराज नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
‘करोना संकटामुळे भाजपाची कार्याकारिणी जाहीर करायची राहिली होती. कोणतीही घोषणा सगळ्यांशी बोलून, सगळ्यांना बरोबर घेऊन करायची असते, त्यामुळे थोडा वेळ लागला. माझ्याबरोबर १२ प्रदेश उपाध्यक्ष आहेत. पाच सेक्रेटरी म्हणजेच सरचिटणीस आहेत. त्याशिवाय एक महामंत्री संघटन म्हणजे सरचिटणीस संघटन असे सहा सरचिटणीस आहेत. एक खजिनदार आणि १२ सरचिटणीस आहेत.
विधानसभा निवडणुकीपासून केंद्रीय नेतृत्व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर नाराज होते. विधानसभेपाठोपाठ विधानपरिषदेची उमेदवारीही त्यांना देण्यात आली नव्हती. असे असतानाही त्यांनी पक्षविरोधी कुठलीही भूमिका न घेतल्याने त्यांना महामंत्रिपदी संधी देण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळचे असलेले बावनकुळे हे सध्या नागपूर तसेच नागपूर जिल्ह्यात पक्षाचा चेहरा आहेत.

 417 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.