सेंट्रल रेल्वे सल्लागार समिती माजी सदस्य अमोल कदम यांच्या मागणीला यश
ठाणे : अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी यामध्ये अंध, अपंग प्रवासी याना फक्त जलद लोकलनेच प्रवास करत जलद थांबा असलेल्या रेल्वे स्थानकावरून लोकलमध्ये चढ- उतरता येत होते. यामुळे सेंट्रल रेल्वेचे माजी सदस्य अमोल कदम यांनी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांकरिता सुरू असलेल्या लोकल सर्व स्थानकावर थांबण्यात याव्या अशी मागणी रेल्वेकडे केली होती, या मागणीला यश आले आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण पुढील कर्जत ते कसारा पर्यंत मार्गावर सकाळच्या वेळी तीन लोकल आणि संध्याकाळच्या वेळी तीन लोकलला सर्व स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून ३ जुलै पासून कल्याण पुढे कर्जत ते कसारा पर्यँत अप आणि डाऊन मार्गावरील तीन लोकल सर्व स्थानकावर थांबणार आहेत. याची वासींद रेल्वे स्थानकावर थांबा देऊन २ जुलैला पहिली सुरुवात रेल्वेने केली असल्याने प्रवाशांच्या हिताकरिता करण्यात आलेल्या मागणीला मोठे यश आले असल्याचे सेंट्रल रेल्वे सल्लागार समिती माजी सदस्य अमोल कदम यांनी सांगितले.
550 total views, 1 views today