डोंबिवलीत मराठी माध्यमांच्या शैक्षणिक संस्थाना नवसंजीवनी मिळणार

भारत विकास परिषद, डोंबिवली शाखेचा उपक्रम

डोंबिवली : भारत विकास परिषद, डोंबिवली शाखेच्या वतीने सुरु होणाऱ्या “एकलव्य योजने” बाबत चर्चा करण्यासाठी एक गुगल मिटिंंग संपन्न झाली. यात परिषदेचे पदाधिकारी,प्रकल्प प्रमुख, सन्मवयक व ह्या उपक्रमासाठी विशेष गठीत केलेल्या सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. शहरातील विविध संस्था, मान्यवर, दानशूर व्यक्ती, व्यापारी मंडळी व उद्याेजक यांच्या सहकार्यने जास्तीत जास्त नागरिकांपर्यत हा उपक्रम पोहचवून गरीब मुलांना माफक दरात शिक्षण उपलब्ध करुन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सर्वानुमते ठरले. या उपक्रमांमुळे शहरातील मराठी माध्यमांच्या शैक्षणिक संस्थाना नवसंजीवनी मिळणार आहे.
उपक्रमांची माहीती देताना १५ शाळांच्या उपलब्ध माहीतीनुसार, इयत्ता १ ते १० वी मध्ये अंदाजे १०,००० ते १२,००० विद्यार्थी शिक्षण घेत असुन सुमारे १८०० विद्यार्थी (२०%) वार्षिक शालेय विकास निधी शाळेत भरु शकत नाही. सदर रक्कम अंदाजे रुपये तीस लाख अपेक्षित असुन इतर शाळा विचारात घेतल्यास रक्कमेत वाढ होवु शकते.फी थकबाकीमुळे काही संस्थांना सोयी उपल्बध करुन संस्था चालविणे दिवसेनदिवस कठिण होत जात आहे. यासाठी नागरिकापर्यत एका आवाहन पत्राद्वारे संपर्क करण्याचे ठरले असुन सोशल मिडिया माध्यमातुन संदेश पाठविण्यास सुरु झाल्याचे सांगितले. जमा झालेल्या वार्षिक शालेय विकास निधीसंकलनातुन शालेय संस्थांना आर्थिक सहकार्य केल्यास जास्तीत जास्त सोयी विद्यार्थ्यांना उपल्बध करुन देणे शक्य होईल. परिषदेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणुन गेल्या २-३ दिवसात शहरातील तसेच परदेशातील स्थायिक असलेल्या नागरिकांचेद्वारे ४७० विद्यार्थी साठाचे रुपये सात लाख रक्कमेचे होकार आले असुन यापैकी रु १,५०,०००/- चे धनादेश उपलब्धही झाले आहेत. हि बाब सर्व नागरिकासाठी स्फुर्तीदायी आहे. सविस्तर चर्चेनंतर उपस्थितांनी हा आदर्शदायी उपक्रम यशस्वी करण्याचा मानस व्यक्त केला

 456 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.