वाढीव वीज बिल संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट

भेटी दरम्यान विविध मुद्यावर केली चर्चा

ठाणे : गेले काही दिवस महाराष्ट्रतील विविध वीज पुरवठा करणाऱ्या आस्थापनांकडून ग्राहकांना अवाजवी बिले आकारण्यात आली आहेत. ह्या विषयी मनसे शिष्टमंडळाने आज राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन पक्षाच्या वतीने निवेदन सादर केलं.
ह्या बैठकीत पक्षाचे नेते  बाळा नांदगावकर , आमदार  राजू पाटील , मनसे नेते अविनाश अभ्यंकर,  ठाणे – पालघर जिल्हा अध्यक्ष  अविनाश जाधव , सरचिटणीस  नयन कदम,  उपाध्यक्ष अरविंद गावडे, नंदकुमार चिले आदी उपस्थित होते.
यावेळी ग्राहकांना सुधारित वीज बिलात ५० % सवलत देण्यात यावी, ग्राहकांना बिलं भरण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात यावा, कोणत्याही परिस्थितीत मीटर लाईन, वीज पुरवठा खंडीत करू नये,  ग्राहकांच्या समस्यांचे तातडीने निवारण करावे, आदी मुद्दे मनसेने उपस्थित केले. सर्व मुद्दे मंत्र्यांनी समजून घेतले आणि लवकरात लवकर ही समस्या सोडवण्याचे मान्य केले.

 399 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.