वाढीव वीज बिलासंदर्भात डोंबिवलीत खुले चर्चासत्र संपन्न

भाजप नगरसेवक नितीन पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित चर्चासत्रात अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या शंकांचे केले निरसन

डोंबिवली : एप्रिल,मे आणि जून २०२० चे वीज बिल हे नागरिकांना परवडणारे नसून ही एकप्रकारे आर्थिक लुट असल्याचा आरोप डोंबिवलीकर करत आहे. यापूर्वी नागरिकांनी आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावर तोगडा काढण्यासाठी भाजप नगरसेवक नितीन पाटील यांनी डोंबिवली पूर्वेकडील तुकारामनगर विभागातील गांवदेवी मंदिराजवळील, भगवती आंगण सोसायटी समोरील मैदानात नागरिकांचे महावितरण कंपनीच्या अधिका-यांशी खुले चर्चा सत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात नागरिकांनी वीज बिले जास्त रकमेची का पाठवण्यात आली यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी चर्चा केली. चर्चासत्रात अति.कार्यकारी अभियंता प्रमोद पाटील, सहाय्यक अभियंता सतिष सूरे आणि महेश चौधरी यांनी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.नागरिकांना पाठण्यात आलेले वीज बिल, त्यावरील एप्रिल २०२० ते जून २०२० पर्यंतचे एकूण युनिट, त्याची केलेली महिनावार विगतवारी, सरासरी बिल म्हणून आपण भरलेले बील, या सर्वांची एका सूत्रात केलेली बांधणी याचे सविस्तर तपशीलासह माहिती देण्यात आली. यावेळी कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमिवर चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी सर्वांसाठी काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. नगरसेवक नितीन यांनी तीन दिवसांपूर्वी दत्तनगर प्रभागात अश्या प्रकारचे चर्चासत्र आयोजित केले होते. याबाबत पाटील म्हणाले, जी वीज बिले नागरिकांना आकारण्यात आली आहे त्यासंदर्भात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत जाब विचारला होता. मात्र दत्तनगर येथील चर्चासत्रात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांच्या आणि माझ्या मनातील शंका दूर झाली. म्हणून तुकारामनगर येथे चर्चासत्र आयोजित केले होते. नागरिकांनी हप्त्याहप्त्याने वीज बिल रक्कम भरली तरी चालेल असे अधिकाऱ्यांनी चर्चासत्रात सांगितले.

 389 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.