पनवेलकरांना जन्म-मृत्यूचा दाखला महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयातूनच मिळणार

पनवेल संघर्ष समितीच्या मागणीला उपयुक्त संजय शिंदे यांचा सकारात्मक प्रतिसाद

पनवेल : जन्म आणि मृत्यू नोंदीचा दाखला महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयातून देण्यासाठी यापुढे कार्यवाही होईल, अशी ग्वाही उपायुक्त संजय शिंदे यांनी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांना दिली.
महापालिका क्षेत्रात ज्या ठिकाणी जन्म अथवा मृत्यू झाला, त्या प्रभागात जावून दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना खुप हेलपाटे मारावे लागत आहेत. कामोठे, खारघर येथील हॉस्पिटलमध्ये पनवेलला राहणाऱ्या व्यक्तीचा किंवा इतर शहरातील नागरिकाचा पनवेलला जन्म, मृत्यू झाला तर त्या प्रभाग समिती कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. त्या ऐवजी नागरिक जिथे वास्तव्यास आहेत, तेथील महापालिकेच्या कार्यालयातून ते दाखले देण्याची व्यवस्था केली गेल्यास अनेकांची डोकेदुखी टळू शकेल. याकरिता पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी महापालिका उपायुक्त तथा जन्म-मृत्यू नोंद विभागाचे प्रमुख संजय शिंदे यांच्याकडे सुचना करताच त्यांनी हिरवा कंदिल दिला. तसे लेखी आदेश प्रभाग समिती अधिकाऱ्यांना ते काढणार आहेत. आठवडाभरात ही प्रक्रिया कार्यान्वित होईल, असे शिंदे यांनी कडू यांना कळविले आहे.
शिंदे यांच्या महत्वपूर्ण निर्णयामुळे कोविड काळात अनेकांना घराबाहेर पडून दाखल्यासाठी नाहक हेलपाटे मारणे टळणार असून कायमस्वरूपी ही कटकट मिटली आहे.

 470 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.