आणखी ५ महिने गरिबांना धान्य मोफत मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली मोठी घोषणा
नवी दिल्ली : जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाविरुद्ध चांगली लढाई लढली आहे. मात्र, अद्यापही संकट टळले नसून जास्तीची खबरदारी घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या काळात कडक नियम पाळण्यात आले. मात्र, सद्य:स्थितीत स्थानिक प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मास्कचा वापर, सामाजिक अंतर हे आजही महत्त्वाचे असल्याचे मोदींनी आजच्या भाषणात म्हटले.
जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाविरुद्ध चांगली लढाई लढली आहे. मात्र, अद्यापही संकट टळले नसून जास्तीची खबरदारी घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या काळात कडक नियम पाळण्यात आले. मात्र, सद्यस्थितीत स्थानिक प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मास्कचा वापर, सामाजिक अंतर हे आजही महत्त्वाचे असल्याचे मोदींनी आजच्या भाषणात म्हटले.
केंद्र सरकारकडून लॉकडाऊन काळात ३० कोटी जनधन खात्यात ३१ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले असून ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले आहेत. प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेचीही सुरुवात करण्यात आली आहे. देशातील ८० टक्के नागरिकांना मोफत धान्य देण्याचे कामही सरकारने केले आहे. आता, प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजना आणखी ५ महिने वाढविण्यात आली असून ८० कोटीपेक्षा जास्त नागरिकांना धान्य मोफत देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करण्यात आला असून नोव्हेंबरपर्यंत ही योजना सुरु राहणार आहे. नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून ५ किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो दाळही मोफत मिळणार आहे. गेल्या तीन महिन्यांचा आणि आगामी ५ महिन्यांच्या मोफत धान्याचा खर्च एकूण १.५० हजार कोटी रुपये एवढा असल्याचे मोदींनी सांगितले. तसेच, अद्यापही काळजी घेण्याचे आवाहन मोदींनी नागरिकांना केले आहे.
दरम्यान, गृहमंत्री अमित शहांनी मोदींच्या भाषणापूर्वी, महत्त्वपूर्ण, आज संध्याकाळी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना उद्देशून होणारे संबोधन जरूर ऐका, असे आवाहन केले होते. त्यामुळे देशावासियांना मोदींच्या भाषणाची आतुरता होती. ट्विटच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी IMPORTANT शब्दाचा उल्लेख केला होता. त्यामुळे, आजच्या भाषणाबद्दल कमालीची उत्सुकताही होती. त्यानुसार, मोदींनी ४ वाजता देशवासियांशी संवाद साधला.

 517 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.