३१ जुलैपर्यंत नव्या सवलतींसह केंद्राचा अनलॉक-२ जाहीर

३१ जुलैपर्यंत नव्या सवलतींसह केंद्राचा अनलॉक-२ जाहीर
जून्या सवलतींसह नव्या सवलतींचा समावेश

नवी दिल्ली-मुंबई : राज्य सरकारपाठोपाठ केंद्रानेही ३१ जुलै पर्यंत अनलॉक-२ जाहीर केला आहे. या काळात खालीलप्रमाणे सवलती देण्यात आलेल्या आहेत.
कंटेनमेंटच्या बाहेर-
१) शाळा, कॉलेज, कोचिंग, शैक्षणिक संस्था ३१ जुलै पर्यंत बंद राहणार. पण ऑनलाईन-डिस्टन्स पध्दतीने शिक्षणाची प्रक्रिया सुरु राहणार.
पण १५ जुलै २०२० पासून प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास राज्य आणि केंद्र सरकार परवानगी देणार.
२) केंद्रीय गृहमंत्रालय ज्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाला मंजूरी देईल तोच विमान प्रवास सुरु होणार.
३) मेट्रो प्रवास
४)चित्रपटगृहे, जिम्नॅशियम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर, बाऱ्स, ऑडिटेरियम, असेंब्ली हॉल्स आणि या सारखी ठिकाणे,
५) सामाजिक, राजकिय, स्पोर्टस्, मनोरंजन कार्यक्रम, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि इतर मोठ्या कार्यक्रम.
आदी गोष्टी सुरु करण्याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच यासाठी स्टॅण्डर्ट प्रोसिजर जाहीर केली जाणार आहेत.
देशांतर्गत विमान सेवा, मर्यादीत रेल्वे सेवा यापूर्वीच ठराविक पध्दतीने सुरु करण्यात आली आहे. या दोन्ही प्रवासांचा विस्तार कालानुरूप वाढविण्यात येणार.
कर्फ्यु-रात्रो १० ते पहाटे ५ यावेळेत कर्फ्यु राहणार आहे. मात्र यातून अत्यावश्यक सेवा, उद्योग-कारखान्यातील उत्पादन, माल चढविणे-उतरविणे, ट्रेन-बस मधून इच्छित ठिकाणी पोहोचलेल्या व्यक्ती यांना यातून सूट देण्यात आली.
कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ जुलै पर्यत लॉकडाऊन लागू राहणार.
कंटेन्मेंट झोन ठरविण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला राहणार.
तसेच कंटोन्मेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी.

 397 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.