रोजगार मदतीसाठी नावे नोंदवण्याचे भाजपचे आवाहन
अंबरनाथ : धुणी-भांडीकरून आपला उदरनिर्वाह करणा-या मोलकरीण महिला आज कोरोना संचार बंदीच्या काळात आर्थिक संकटात सापडल्या आहेत. येथील अडीचशेहुन अधिक असंघटीत महिला कामगारांची घरची परस्थिती अतिशय बिकट झाली आहे. घरकाम करायला त्यांना सोसायटी, घरांमध्ये प्रवेश मिळत नाही. ‘ फॉरेस्ट नाका ‘ हा दुर्लक्षीत भाग आहे. या ठिकाणी एकही कोरोना रूग्ण नसल्याची माहिती घरेलू महिलांनी दिली आहे. दरम्यान ज्या-ज्या घरेलु महिला कामगारांना कामाची गरज आहे. अशा महिलांनी भाजपाकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन भाजप नेेते गुलाबराव करंजुले यांनी केले आहे.
कल्याण बदलापुर राज्यमार्गावरील फॉरेस्ट नाका येथील सुमारे अडीचशेहुन अधिक घरेलु कामगार महिला या महाराष्ट्र् राज्य घर कामगार युनियनच्या सदस्या आहेत. परंतु त्यांची अद्याप नोंदणी झालेली नाही. कोरोना महामारी मुळे घरकाम बंद झाल्याने गेल्या चार महिन्यापासुन येथील कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. वेळेवर अत्यावश्यक रेशन मिळत नाही. अश्या अवस्थेत लाॅकडाउनच्या काळापासुन गुलाबराव करंजुले प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन शहराध्यक्ष अभिजीत करंजुले व विश्वजीत करंजुले यांच्या सहकार्याने आजपर्यंत फॉरेस्ट नाका वस्तीत धान्यवाटप, शिजवलेले अन्य, मास्क आणि वेळोवळी औषधे पुरवली जात आहेत.
येथील असंघटीत घरेलू काम करणाऱ्या महिलांना सोसायटी, घरांमध्ये घरकामासाठी प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे मोलकरणींना हक्काचा रोजगार मिळालाच पाहिजे. शासनाने घरकामगार महिलांचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी करत भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराचे पदाधिकारी व भाजप नेते गुलाबराव करंजुले यांच्या पुढे आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी भाजप शहर अध्यक्ष अभिजित करंजुले, विश्वजित करंजुले, दिलीप कणसे, विश्वास निंबाळकर, डॉ.आशिष पावस्कर, संतोष शिंदे, श्रीकांत रेड्डी, संतोष वंदाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अंबरनाथ येथील फोरेस्ट नाका वस्तीत एकही रूग्ण नसल्याची माहीती घरकामगार महिला देत आहेत. असे असताना त्यांची गळचेपी होते. त्यांना कुठल्याही घरात, सोसायटीमध्ये गेल्यावर काम मिळत नाही. कंपन्यामध्ये काम मिळत नाही. वास्तविक पहाता परिसरातील उच्चभु वस्तीमध्ये कोरोना बाधीत आहेत. मात्र या वस्तीचे नाव खराब केल जात असल्याचा आरोप भाजप नेते गुलाबराव करंजुले यांनी करत प्रशासनाने कोरोना बाधितांचे मुळ स्थायी पत्ते जाहीर करावेत अशी यावेळी मागणी केली.
गेल्या चार महिन्यापासुन आम्ही उपाशी पोटी जगतोय, आमची चुल पेटत नाही. शासनाकडुन कोणतीही मदत मिळत नाही. घरकाम महिलांना काम नसल्याने निराधार झाल्या आहेत. मुलांना, पुरूषांना रोजगार नाही. तांदुळ मिळतात त्यासोबत काय खायच. पांढरा भात करून खातोय, तेल पिठ घरात नाही. सरकारी धान्य वेळेवर मिळत नाही. मुलाबाळांच्या औषधासाठी पैसे कुठुन आणायचे ? विधवा व वयोवृद्धांचे बेहाल झाले आहे. बहुतांश वस्तीमधील कुटुंबाचा उदरनिर्वाह घरेलु महिला कामगारांच्या रोजगारावर चालत असल्याची व्यथा महाराष्ट्र् राज्य घर कामगार युनियनच्या सदस्या आशा गायकवाड, सुलोचना म्हस्के, जुलेखा शेख, आदी सुमारे अडीशे घरेलु महिला कामगारांनी भाजपा पदाधिकाऱ्यासमोर मांडल्या.
यावेळी सहावीत शिकणा-या मुलीने “माइया आईला रोजगार मिळत नाही, ती मला मोबाईल घेवुन देवु शकत नाही. मग आम्ही ऑनलाईन शिक्षण कस घ्यायचं असा सवाल उपस्थित केला.
497 total views, 2 views today