वालधुनी नदी स्वच्छतेसाठी नागरिकांचे भीक मांगो आंदोलन

नदीचे पूजन करून नदी स्वच्छ करण्याची शपथ घेत केला एल्गार

कल्याण : वालधुनी नदी स्वच्छता समिती तर्फे २८ जून रोजी प्रभाग क्रमांक १६ येथिल योगी धाम परिसरात वालधुनी नदी किनारी ‘नदी आमची आई’ ही उक्ती मनाशी बाळगून नदी पूजनाचा कार्यक्रम समितीच्या अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी, सचिव आर्किटेक्ट गणेश नाईक, कार्याध्यक्ष सुनिल उतेकरयांच्या वतीने आयोजित करण्यात आला. या प्रसंगी योगी धाम येथिल ज्येष्ठ नागरिक राम राठी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नदीचे पूजन करण्यात आले. तसेच नदी स्वच्छते साठी विनोद शिरवाडकर यांनी लिहिलेली शपथ सर्वाकरवी घेण्यात आली. या प्रसंगी नदी संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणार्‍या मनिषा केळकर या आवर्जून उपस्थित होत्या.त्यांनी समिती पदाधिकारी व सदस्यांसह उपस्थित नागरिकांचे कौतुक करून, नदी संवर्धनाच्या कार्यात सर्वतोपरी मदत करणाऱ्याचे आश्वासन दिले.
तसेच निधी अभावी या नदीची स्वच्छता होत नसल्या कारणाने समितीतर्फे ‘भीक मांगो’ आंदोलनाचा छोटेखानी कार्यक्रम याप्रसंगी करण्यात आला. या पुढे नदी स्वच्छते साठी, रहिवाशांकडे भीक मागून, शासनास मोठ्या प्रमाणात मदत मिळवून देण्याचा मानस समिती च्या वतीने व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक सीता नाईक, भरत खानविलकर समिती पदाधिकारी पंकज डोईफोडे,विनोद शिरवाडकर, जयश्री सावंत,मनिष खानविलकर, सर्पमित्र चंदन ठाकूर यांच्यासह योगी धाम व शिव अमृत धाम परिसरातील नागरिक सर्वश्री जैस्वाल , योगेश शिंपी, लक्ष्मण देसले सर,डी. एम. गव्हाळे साहेब,डी. एन. झा साहेब, सुनीता भागवत, गीता बेहरा, सुरेंद्र शर्मा, कैलाश शिरसाठ, हरीष शेनॉय, दीपक कोळंबे, दीपक राठी, रामजी गुप्ता आदी नागरिक आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष सुनिल सिताराम उतेकर यांनी केले. या लोकोपयोगी कार्यास नंदिकेश्वर सामाजिक संस्था व नदी बिरादरी संस्थेने जाहीर पाठींबा जाहीर केला आहे.

 457 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.