प्रभागात सलग दुसऱ्यांदा केले मोफत अन्नधान्य वाटप, मास स्क्रिनिंग व आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप
नवी मुंबई : कोरोना सारख्या महामारीशी आपण सर्व जण च लढत आहोत. पहिल्या दिवसापासून विविध उपाययोजना प्रभागात सुरू आहेत,तरी त्याच अनुषंगाने दुसऱ्यांदा ५७० घरातील रहिवाशांना स्वखर्चाने सरसकट अन्नधान्य वाटप करण्यात आले . त्या मध्ये नेरुळ सेक्टर १६ मधील महालक्ष्मी सोसायटी, अवधूत सोसायटी , दत्ताकृपा सोसायटी,श्री विनायक सोसायटी ,पंचरत्न सोसायटी, सेंच्युरी सोसायटी ,सेक्टर १६ A , सर्व सुरक्षा रक्षक व तसेच रिक्षा चालक यांचा समावेश होता.त्या प्रसंगी उपस्थित नगरसेवक काशिनाथ पवार, उपविभागप्रमुख प्रकाश पाटणकर, जेष्ठ शिवसैनिक जय शिवतरकर,सुहास सावंत,प्रताप मोरे, राष्ट्रवादी वॉर्ड अध्यक्ष प्रदीप कलशेट्टी ,अशोक इले,संजय माने,युवा शाखाधिकारी सुनील पाटील, युवा सैनिक चेतन पवार, अनिकेत पवार, प्रतिक विधाते, अनिकेत घोगरे, संदेश सावंत,वेदांत शिंदे, तेजस माने व सोसायटी मधील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सर्वांचे मास स्क्रिनिंग व आर्सेनिक अल्बम ३० गोळ्याचे ही वाटप करण्यात आले .
770 total views, 3 views today