बेस्ट, टीएमटी बसचा मार्ग वाढवा

गोरगरीबांच्या नोकर्‍या वाचविण्यासाठी दिव्यांग संघटनेची मागणी

ठाणे : तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे अनेक नोकरदार आपल्या घरी बसले आहेत. सुरुवातीच्या काळात लोकांना व्यवस्थापनाने पगार दिला होता. मात्र, आता तोही बंद झालेला असल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात अनेक व्यवस्थापने सुरु झाली असली तरी वाहनांची सुविधा नसल्याने कामगारांना नोकरीचे ठिकाण गाठता येत नाही. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये सुरु असलेल्या बेस्ट, एसटी आणि टीमएमटीच्या मार्गांमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी मागणी विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी संघटना संचालित बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटने चे निमंत्रक मोहम्मद युसूफ मोहम्मद फारुख खान यांनी केली आहे.
मागणी विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी संघटना संचालित बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटने चे निमंत्रक मोहम्मद युसूफ मोहम्मद फारुख खान यांनी या संदर्भात मुख्यमंत्री, परिवहन मंत्री , टीएमटी उपायुक्त आणि बेस्ट प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे.
खान यांनी दिलेल्या निवेदनानुसार, गेल्या तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता आपण पुढाकार घेऊन अनलॉकडाऊन सुरु केले आहे. पहिल्या टप्प्यात करण्यात आलेल्या अनलॉकडाऊनमध्ये आपण बेस्ट आणि टीएमटी बससेवा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ठाणे शहरात बेस्टच्या बसगाड्या येत आहेत. मात्र, बेस्ट कडून सोेडण्यात येणारी ४९४ ही घाटकोपरहून सुटणारी बस मुंब्रा रेतीबंदरपर्यंत येत आहे. तेथूनच ती परत जात आहे. त्यामुळे मूळ गरजवंताला या बेस्ट बसचा काहीही उपयोग होत नाही.
मुंब्रा, कौसा, डायघर भागात राहणारे अनेक चाकरमानी हे मुंबईमध्ये नोकरी करीत आहेत. या भागात राहणारे अनेक लोक हे मुंबईमध्ये हमालीचे काम करीत आहेत. त्यांच्या आस्थापना सुरु करण्यात आलेल्या आहेत. मात्र, लोकलसेवा बंद असल्याने त्यांना कामाच्या ठिकाणी जाणे शक्य होत नाही. बेस्ट बस रेतीबंदर पर्यंतच येत असल्याने डायघर किंवा कौसा भागातून रेतीबंदर गाठणार्या चाकरमान्यांना खासगी वाहने (रिक्षा- टॅक्सी) किमान शंभर रुपयांचा खर्च करावा लागतो. हातावर पोट असणार्‍या कामगार वर्गाला हा खर्च करणे परवडणारे नाही केवळ प्रवासावर सुमारे ३ हजार ७५० रुपये खर्च केल्यास पोट भरणे जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे हीच बेस्टची बससेवा मुंब्रा रेतीबंदरपर्यंत न ठेवता तिच्या मार्गात वृद्धी करुन ती भारत गिअर्स ते बोरीबंदर पर्यंत सुरु करावी. तसेच,काही महिन्यांपूर्वी शिवाई नगर येथून एसटीची बसही मुंबई- बोरीबंदर पर्यंत धावत होती. ही बस सद्यस्थितीमध्ये बंद आहे. ही बसगाडीही सुरु करण्यात यावी; या बसगाडीचाही मार्ग भारत गिअर कंपनी ते बोरीबंदर व्हाया शिवाई नगर असा करण्यात यावा. मार्गामध्ये वाढ केल्यास बेस्ट आणि एसटीच्या उत्पन्नामध्येही वाढच होणार आहे, असेही खान यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

 500 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.