माजी खासदार, आमदारांना पुढील ३ वर्षे निवृत्ती वेतन न देण्याची केली मागणी
कल्याण : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे ॲडव्होकेट सुरेश माने यांच्या मार्गदर्शना खाली कल्याण पश्चिम येथे ”मुक प्रदर्शन” करण्यात आले. व कल्याणच्या नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाद्वारे महाराष्ट्रातील वाढता दलित अत्याचार प्रकरणी व युवा हत्या यांची चौकशी करणे. महाराष्ट्रातील अनु जाती व जमाती हा बहुतांशी दारिद्र ग्रस्त उपेक्षित वर्ग असल्याने अर्थ साधने रोजगार व इतर जीवनावश्यक बाबींची त्यांच्याकडे कोरोना लॉकडाऊन कालखंडात अत्यंत बिकट अवस्था असल्याने राज्यातील या उपेक्षित घटकांसाठी सरकारच्या संबंधित मंत्रालयीन योजनांची त्वरित प्रभावीपणे अंमलबजावणी करावी व या वर्गाची बजेट रक्कम याच बाबतीत १००% वापरात आणावी.
कोरोणा लॉक-डॉउन काळात आर्थिक मंदी व उध्वस्त गोरगरिबांचे कौटुंबिक आर्थिक बजेट अथवा नोबजेट हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व अत्यंत गोरगरीब प्राथमिक माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची फी माफी करावी व खाजगी शाळांना योग्य सवलतीसाठी व पालकांना पूर्णवेळ देण्यासाठी सरकारने त्वरित संबंधित मंत्रालय विभागांना आदेश द्यावे.
केंद्र सरकारने देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व गोरगरिबांना आर्थिक सहाय्य करून त्यांची खरेदी क्षमता वाढविण्यासाठी केंद्र सरकार दारिद्र्यरेषेखालील गरीब परिवारांना आगामी ३ महिने प्रत्येक महिन्याला गरीब कुटुंबात रुपये ५००० फक्त प्रधानमंत्री केयर फंडातून अथवा केंद्र सरकारच्या कोणत्याही विशेष आर्थिक पॅकेज द्वारा अर्थसहाय्य करावे. केंद्र सरकारने कोरोना विरोधी संघर्ष आर्थिक मंदी बिकट अर्थव्यवस्था व अल्प उत्पन्न साधने लक्षात घेता. केंद्र सरकारने देशातील सर्व माजी खासदार आमदार ज्यांची संपत्ती एक करोड पेक्षा जास्त आहे. त्यांची आगामी ३ वर्षे तरी पेन्शन बंद करून ही सर्व रक्कम कोरोना संघर्षात वैद्यकीय सेवेसाठी वापरात आणावी. अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष विधानसभा ललित कुमार तायडे, संयोजक सतीश बनसोडे, लव जाधव, अनिकेत पवार, ललित हुमणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
459 total views, 2 views today