राजावाडी हेल्थ पोस्टच्या कोरोना योद्ध्यांचे सत्कार

कोरोना योद्द्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबवला उपक्रम

कल्याण :  राजावाडी हेल्थ पोस्ट, घाटकोपर येथील डॉक्टर व वरिष्ठ परिचारिका यांचा सन्मान मुंबई महानगरपालिका शिक्षिका, कवयित्री समाजसेविका व उपसंपादिका मंजू सराठे व समस्त टीमच्या माध्यमातून करण्यात आला.
      मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत असला तरी आपले डॉक्टर्स, आरोग्य कर्मी व सफाई कामगार आपले काम निस्वार्थ वृत्तीने अगदी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. आपली सेवा बजावताना ते एवढे व्यस्त असतात की त्यांना आपल्या  जीवनाच्या वेळेचे भानही नसते. आपल्या कुटुंबाशी दूर राहून रात्रंदिवस ते कामातचं व्यस्त. वैद्यकीय आरोग्य अधिकारी महेंद्र खंदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राजावाडी हेल्थ पोस्टचे डॉ.वैभव पाटील हे त्यापैकी एक म्हटलं तर वागव ठरणार नाही. त्यांच्यासोबत  वरिष्ठ परिचारिका सुजाता आडके , सुमन मेडे , सतीश सर, सुरेखा गेडाम, योगिता तांबे , सुमन गांधी , सुजीत हिरे तसेच (सी.एच.व्ही)आरोग्य स्वयं सेविकांसोबत त्यांचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे. कोविड-१९ची ड्यूटी करताना आम्हाला त्यांच्या कार्याबद्दल ची धडपड व तळमळ दिसून आली. विशेष म्हणजे समाज सेवा करताना स्वतःला शांत ठेवून आपल्या स्टाफला देखील शांतपणे काम कसे करता येईल हे समजून सांगणारे एकमेव डॉ.वैभव पाटील. सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने वागणारे हसत खेळत, गमतीजमती करत, तणाव विरहित राहून आनंदाने काम कसे करावे हे त्यांच्याकडूनचं शिकावे.
       म्हणूनच अश्या या खरे कोरोना योद्ध्यांचे सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी १७ रोजी सहा ते सात लोकांच्या उपस्थितित सोशल डिस्टंसिंग चे पालन करून डाॅ.वैभव पाटील व वरिष्ठ परिचारिका सुजाता आडके यांना  सराठे यांनी आपल्या कदम कदम पर समाचार पत्र व समस्त कोविड-१९ टीमच्या वतीने शाॅल व श्रीफळ  देऊन सन्मानित केले त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आपले सर्व  डॉक्टर्स ,आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार व पोलीस आपल्या देशाची शान आहेत आणि आम्हां सर्वांना त्यांच्यावर अभिमान आहे असे  सराठे यांनी सांगितले.
       आपल्या कार्य बाहुल्या तून वेळ काढून त्यांनी वेळ दिल्याबद्दल सराठे  यांनी आपल्या टीमच्या वतीने म्हणजेच विद्या आहेर, सुषमा महाजन, चंद्रकला जैसल, नेहा तलरेजा, हरिश्चंद्र जैसवार, विनोद जाधव या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा दिल्या.

 678 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.