डोंबिवलीत चार तास बत्ती गुल…

काम महापालिकेचे ,ताप महावितरणला

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेची गोग्रासवाडी परिसरात कामे सुरू असून त्यासाठी रस्ते खोदले जात आहेत मात्र रस्ता खणत असताना ठेकेदार योग्य काळजी घेत नाही महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत असून त्यावर खोदताना घाव बसल्याने वीज वाहिन्या तुटून वीज पुरवठा खंडित होत आहे गोग्रासवाडी भागात आज सकाळी १० -१० -३० वाजल्यापासून वीज खंडित झाली आहे सुमारे ५ तास वीज पुरवठा खंडित आहे .काम महापालिकेचे व ताप महावितरण कंपनीला अशी संतप्त भावना महावितरण अधिकारी व्यक्त करीत आहेत.
गोग्रासवाडी ,अंबिका नगर ,नामदेव पथ ,पाथरली आदी भागात सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास वीज पुरवठा अचानक खंडित झाला महावितरण विभागाने महापालिकेचे काम सुरू असताना नामदेव पथावरील खोदण्याचे काम करत असताना मुख्यविज पुरवठा करणारी उच्च दाब वाहिनी तुटली व वीज पुरवठा खंडित झाला असे कळवले व दुपारी ३ -४ पर्यंत वीज पुरवठा सुरू होईल असे कळवले. गेले काही दिवस डोंबिवलीत पाऊस गायब असून यामुळे उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत त्यातच वीज खंडित झाल्याने घरात थाबने अवघड होतं आहे या संदर्भात महावितरण अधिकाऱ्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले की ,कल्याण डोंबिवली महापासलिकेची कामे सुरू असून रस्ता खोदत असताना योग्य काळजी घेतली जास्त नाही यामुळे भूमिगत वीज वाहिनी तुटते व वीज खंडित होते हे केवळ इकडे नाही कल्याण डोंबिवलीत असच होत आहे ,काम महापालिकेचे व ताप महावितरण कंपनीला अशी तिखट भावना व्यक्त केली
डोंबिवली पूर्व भागात भूमिगत वीज वाहिन्या असून वीज खंडित झाली तर कुठे काय झालं हे शोधून काढण्यास वेळ लागतो ,मात्र ओव्हर हेड केबल असेल तर लगेच समजत ,पालिकेने कंत्राटदाराला काम दिले असेल पण त्यावर देखरेख कुणीच ठेवत नाही यामुळे अशा घटना घडतात असेही सांगितले दुपारी ३ वाजे पर्यंत वीज पुरवठा सुरू झाला नव्हता असे नागरिकांनी सांगितले म्हणते सुमारे ५ तास बत्ती गुल आहे डोंबिवली गोग्रासवाडी भागात भूमिगत वीज वाहिनीत बिघाड झाला असून दुरुस्तीचे काम सुरू आहे असे डोंबिवली कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड म्हणाले.

 410 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.