भोईर दाम्पत्यांनी केले रक्तदान
अंबरनाथ : कोरोना सारख्या भयंकर महामारी मध्ये कोरोना रुग्णांना रक्ताचा तुटवडा होऊ नये या करिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अंबरनाथ व मध्यवर्ती शासकीय हॉस्पिटल उल्हासनगर संचालित रक्तपेढी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन अंबरनाथ मधील खेर विभागातील गोखले रहाळकर शाळे मध्ये करण्यात आले होते. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे शहर अध्यक्ष कुणाल भोईर आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका अपर्णा भोईर या दाम्पत्याने प्रत्यक्ष रक्तदान करून मनविसेच्या या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दिला.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन अंबरनाथ शहरातील ज्येष्ठ पत्रकार गिरीश त्रिवेदी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शिबिरा मध्ये परिसरातील ५१ लोकांनी रक्तदान केले. यावेळी पत्रकार ज्येष्ठ प्रशांत मोरे, ज्येष्ठ प्रवचनकार पुरुषोत्तम उगले महाराज, मनसे जिल्हा संघटक संदीप लकडे, उपजिल्हा अध्यक्ष शैलेश शिर्के, शहराध्यक्ष कुणाल भोईर, उल्हासनगर मनसे अध्यक्ष बंडू देशमुख, अविनाश सूरसे, समीर पवार, महेश टोपले नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र नव निर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष धंनजय गुरव यांनी या कोरोनाच्या कठीण प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करून युवकांमध्ये रक्तदानाचे महत्व आणि जागृती घडवून आणली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान केले आहे हे कौतुकास्पद असल्याचे मनसेचे उल्हासनगर शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी सांगितले. कोरोनाच्या या युद्धात राजकीय जोडे आणि विचार बाजूला ठेवून मनसे सर्वांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून मदत कार्यात सहभागी असल्याचेही देशमुख म्हणाले.
आलेल्या मान्यवरांचे महाराष्ट्र नव निर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष धनंजय गुरव यांनी तुळशीचे रोप देऊन स्वागत केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी समीर मयेकर, अंकित कांबळे, रोहित शिंदे, आशुतोष थोरात, निखिल झवेरी आदींनी परिश्रम घेतले.
506 total views, 1 views today