बीज कंपन्यांवर कारवाई करा राष्ट्रवादीकाँग्रेसची कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
मुंबई : अनेक कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवत नसल्याने मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे पंचनामे करून बीज कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे आज करण्यात आली.
मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली आहे. मात्र अनेक कंपन्यांचे बियाणे उगवत नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावल्याची बाब राष्ट्रवादीने निवेदनाद्वारे कृषीमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील,सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.
399 total views, 3 views today