भाजपाच्या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष पंकज चोळेकर यांच्या वतीने व केमिस्ट ब्लड बॅंक यांच्या सहकार्याने आयोजित शिबिरात १११ बाटल्या रक्त जमा


अंबरनाथ : चीन सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष पंकज चोळेकर यांच्या वतीने व केमिस्ट ब्लड बॅंक, सानपाडा यांच्या सहकार्याने त्रिमुर्ती हाॅस्पिटल, भाजपा जनसंपर्क कार्यालयाजवळ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ह्यावेळी १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. १११ बाटल्या रक्त जमा होणे हे भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीचे दर्शन असल्याचा मनोदय भाजपा शहराध्यक्ष अभिजीत करंजुले यांनी यावेळी व्यक्त केला.
१९६२ च्या चुकीचे पाप आज आपल्या वीर जवानांना नाहक भोगावे लागत आहे. आपल्या ताटावर जगणारे मांजर नेपाळ सुध्दा वाकडया नजरेने पाहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता गाफील राहुन चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प बसणार नाहीत. परंतु आपण जागरूक होवुन संपुर्ण पणे चिन उत्पादित वस्तुंवर बहिष्कार घातला पाहिजे असे आवाहन भाजप नेते गुलाबराव करंजुले यांनी यावेळी केले.
चिनच्या सिमेवर लढताना आपले विर जवान शहिद झाले. त्यांचा विश्वासघात करून हत्यार नसताना त्यांचे हालहाल करून चिनने मारल. त्या सर्व वीर जवान शहिदांना भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने श्रध्दांजली अर्पीत करण्यात आली.
१९६२ च्या काळात मोठी चुक झाली. त्या चुकीचे पाप आज भोगाव लागतय. वीर जवानांना प्राणाची आहुती दयावी लागत आहे. भारताच्या सिमा परिसरात चिन आक्रमण करत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातुन आपल्या हक्काच्या जमिनीसाठी संघर्ष होतोय. त्यामुळे चायनाशी निगडीत सर्वच बाबतीत बहिष्कार घालुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी चिनी वस्तुंवर शंभर टक्के बहिष्कार घालण्याची वेळ आली आहे. जनता प्रत्यक्ष रणांगणात युध्द करू शकत नाही पण आपण प्रथम राष्ट्र् संकल्पनेतुन चिनच्या सर्वच वस्तुंवर बहिष्कार घालुया असे आवाहन भाजपा शहराध्यश अभिजीत करंजुले यांनी केले.
माजी शहराध्यक्ष भरत फुलोरे यांनी काॅंग्रेसने या देशाची आजवर फसवणुकच केली. आपल्याच पैशातुन आपल्या जवांनावर गोळीचा वापर करणा-या चिनच्या वस्तुंवर बहिष्कार हाच एकमेव तरूणोपाय असल्याचे ते म्हणाले.
यावेळी भाजपाचे सरचिटणीस दिलीप कणसे, डाॅ. आशिष पावसकर, महिला शहराध्यक्ष सुजाता भोईर, राजु महाडीक, नगरसेवक रोहीत महाडीक, राजेश नाडकर,माजी सभापती लालमन यादव, उपाध्यक्ष दिपक कोतेकर, मनिष गुंजाळ, नितीन परब, महेश मोरे, संतोष शिंदे, देवेंद्र यादव, श्रीकांत रेड्डी, विश्वास निंबाळकर, आशा देशमुख, आरती मेहता, जोसेफ लोपेझ, सुरेश जाधव, संतोष वंदाल, धनराज चोळेकर, प्रथमेश राणे, बंटी पाटील, आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 542 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.