…. तर पालकमंत्रीही बदला

मनसे चे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची मागणी
ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना आजाराने कहर केला आहे. यासाठी विद्यमान ४ पालिका आयुक्तांचा बळी देत त्यांची बदली केली आहे. नियोजनात प्रशासनाबरोबर सत्ताधारी पालकमंत्री पण अपयशी ठरले असून नुसती पोकळ घोषणाबाजी करणारे पालकमंत्री बदलावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे – पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.
ठाणे शहरात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत पालिका आयुक्तांना दोषी धरत शासनाने ठाणे जिल्ह्यातील चार आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. प्रशासन जसे दोषी आहे त्या प्रमाणे नैसर्गिक नियमानुसार सत्ताधारी पण तितकेच दोषी आहेत. बहुसंख्याने पालिका पालकमंत्री यांच्या ताब्यात आहेत. पालकमंत्री यांनी मोठी घोषणा करून एक हजार बेड चे रुग्णालय उभे केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन ही केलं. मात्र आज वास्तवात हा हॉस्पिटल मध्ये साधा स्टाफ ही नाही. पालकमंत्री कोरोनाच्या उपाययोजना बाबत मोठ्या घोषणा करतात पण वास्तवात त्याची अमलबजावणी होत नाही. जसे पालिका आयुक्तांची मुख्यमंत्री यांनी बदली केली त्या प्रमाणे ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्रीही बदलावा अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे.

 491 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.