पेशंट ऍडमिशन सेंटरची स्थापना करा

शिवसेना नगरसेवक दिपेश म्हात्रे यांची मागणी

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये पेशंटची संख्या एक हजाराने वाढलेली आहे. हा प्रादुर्भाव आपल्याला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करणे गरजेचे आहे. पॉझिटिव पेशंट येत आहेत त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये बेड मिळत नाहीत. वेंटिलेटर ऑक्सिजनची गरज लागली तरीही त्यांना बेड मिळण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, यामुळे त्यांच्या परिवाराला या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला तातडीने काही उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. तातडीने एक पेशंट ऍडमिशन सेंटरची स्थापना करावी अशी मागणी स्थायी समिती माजी सभापती तथा शिवसेना नगरसेवक दिपेश म्हात्रे यानी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. महापालिका क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व प्रायव्हेट व महापालिकेच्या ताब्यात असलेले काही हॉस्पिटल्स यांची व्हेंटिलेटर ऑक्‍सिजन व इतर बेडची संख्याची संपूर्ण माहिती असेल हया सेंटरला असेल.एक हॉट लाईन नंबर जाहीर करावा या नंबर वर पॉझिटिव्ह आलेल्या पेशंटचे परिवारातले लोक कॉल करून बेड ची उपलब्धता विचारू शकतात आणि त्यांना महापालिकेच्या क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध आहेत. त्याची माहिती आपल्या महापालिकेच्या या सेंटरमध्ये पुरवली जाईल जेणेकरून पेशंटच्या परिवाराला व पेशंटला इतरत्र फिरण्याची गरज राहणार नाही. याच्यात दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर पॉझिटिव पेशंट फिरणार नाही व इतरांना प्रादुर्भाव होणार नाही व आधीच तणावात असलेल्या पेशंटला इतरत्र फिरावं लागणार नाही. मी दिलेल्या सूचनेचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करून त्याच्यावर त्वरित निर्णय घ्यावा माझी आपल्याला अशी विनंती नगरसेवक म्हात्रे यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे मागणी केली आहे.

 497 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.