अखेर कोरोना संघर्ष समिती चे कल्याण पुर्वेतुन आंदोलन सुरु


कल्याण पूर्व भागाकडे दुर्लक्ष केल्याचा आंदोलकांचा आरोप

कल्याण : कल्याण पुर्वेत कोविड १९ संदर्भात आरोग्य सेवे बाबत  कोणतीच उपाय योजना , महापालिके मार्फत नाही .
फक्त तापाचे रुग्णालया व्यतीरीक्त काहीही ठोस यंत्रणा ,पुर्वेत नसल्याने कोविड १९ बाधित , कोविड संशयित नागरीकांची अतिशय परवड होत आहे .

कल्याण पुर्वेत आरोग्य सेवा ,हॉस्पिटला पोहचून सुध्दा बेड,सेवा , उपचार न मिळाल्याने दोन रुग्ण दगावलेत.
वारंवार मागणी करुन कल्याण पुर्वेत, कोरंटाईन सेंटर ,कोविड १९ उपचारार्थ रुग्णालय ,सशयीत रुग्णाकरिता खाजगी होस्पिटल मधे आयसोलेशन वार्ड ,लहान मुलांसाठी कोविड रुग्णालय ,त्वरीत रिपोर्ट मिळण्या करीता जादाची लैब ,PCR मशीन ,  पुर्ण वेळ अँब्यूलन्स , अशा सुविधा मिळत नाही.

उपचार व टेस्ट करीता द्यावे लागणारे चार्जेस परत मिळावे .खाजगी रुग्णालयात दर्शनी ठिकानी हॉस्पिटल चे चार्जेस बाबत बोर्ड लावण्यात यावा. याबाबत व इतर  आरोग्य सुविधा देण्यास पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे .

त्यामुळे येणारा काळ कठिण असनार आहे  .हे वारंवार पालिकेच्या निदर्शनास आणुन सुध्दा तातडीने पावले उचले जात नाहित .

अखेर  कल्याण पुर्वेतील सामजिक कार्यकर्त्यांनी एकत्री येवुन नागरीकान्सोबत कोरोना संघर्ष समिती कल्याण पुर्व हा प्लाटफॉर्म तयार केले  आहे त्या माध्यमातून आज पासुन ऑनलाइन आंदोलन सुरू केले झाले आहे . आंदोलन लक्षवेधी होईल असे आयोजकांचे म्हणणे आहे .कल्याण पुर्वेतील नागरीकांना  या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंग पाळुन  सहभागी व्हावे असे आव्हाहन केले आहे .असे प्रमुख आयोजकां पैकी उदय रसाळ  विजय मोरे, विनोद तिवारी,शैलेश तिवारी ,प्रशांत जाधव,  राहुल काटकर यांनी सांगितले

कल्याण पुर्वेतील अनेक सामजिक कार्यकर्ते ,सामजिक सन्स्था संघटना  हे या आंदोलना करीता आग्रही भूमिकेत आहेत .जो पर्यंत मागणी पुर्ण होत नाही तो पर्यंत ,आंदोलन सुरुच राहिल उद्या प्रत्यक्ष सर्व प्रभाग क्षेत्र कार्यलया समोर फेस बुक लाईव येवुन पालिकेच्या कार्य पध्दतीचा समाचार घेतला जाणार आहे .असे ही आयोजक उदय रसाळ यांनी सांगितले .

 413 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.