डोंबिवलीत मोफत रूग्ण सेवा

कोरोना पाॅझिटिव्ह निराधार व वाळीत टाकलेल्या रुग्णांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लालबावटा रिक्षा युनियन आणि प्रमोद कोमास्कर स्मृती सेवा ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम

डोंबिवली : कोरोनामुळे कोणी माणुसकी विसरले तर कोणी परक्याच्या मदतीला धावून आले असे चित्र सर्वत्र दिसते.म्हणूनच भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लालबावटा रिक्षा युनियन आणि प्रमोद कोमास्कर स्मृती सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना पाॅझिटिव्ह निराधार व वाळीत टाकलेल्या रुग्णांसाठी मोफत रूग्ण सेवा सुरु केली आहे.

कोरोना वायरसची लोकांमधे जबरदस्त गैरसमज व भिती पसरली आहे. काही रुग्णालयात देखील अशा रुग्णांचे फार हाल होत आहेत. अशा परिस्थितीत या रुग्णांना मानसिक आधाराची फार मोठी गरज असते. अशा रुग्णांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लालबावटा रिक्षा युनियन आणि प्रमोद कोमास्कर स्मृती सेवा ट्रस्टच्या वतीने त्यांना दररोज चहा, नास्ता, जेवणाची व्यवस्था आणि टाँवेल, चड्डी,बनियान, रुमाल,टुथपेस्ट, ब्रश,बिस्कीट इत्यादी वस्तुंचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच अशा रुग्णांना कार्यकर्त्यांबरोबर मित्र समजून दररोज फोनवर बोलता येईल आणि इतर काही लहानसहान मदती बाबत देखील चर्चा करता येईल.कोरोनाला घाबरून आपल्या नात्यातील कोणालाही वाळीत टाकू नका ! कोरोना विषाणू हा आपल्या अंगावर उडून येत नाही. फक्त हाताचा स्पर्श कुठे करू नये आणि चेहऱ्याला हात लावू नये. म्हणून हाताला सतत सँनिटायजर करा. तोंडाला मास्क वापरा.हि सेवा डोंबिवलीतील रुग्णालयांसाठी मर्यादित असल्याचे लालबावटा रिक्षा युनियन अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी सांगितले. सदर उपक्रमाला मदतीसांनी हातभार लावल्यास रुग्णांना अधिक चांगली सेवा देता येईल. तसेच आमच्या बरोबर प्रत्यक्षात रूग्ण सेवा देण्यास इच्छुक असणाऱ्यांनी देखील संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क :

१) काँम्रेड काळू कोमास्कर 8888100066,
२) काँम्रेड राजेश कदम 9820086481,
३) काँम्रेड महेश आवारे 9819649562 ,
४) मानसी गवाणकर 9867986522,
५) काँम्रेड वर्षा महाडिक 8097590758,
६) गुलाब माने 8928866795
७) काँम्रेड पदमाकर पाटील 9833568597,
८) काँम्रेड विलास शेळके 9029770783
९) काँम्रेड प्रविण पाटील 8888900055,
१०)काँम्रेड सुनील पाटील 9221311939.

 369 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.