वेळोवेळी नागरिकांच्या प्रश्नांबाबत सभागृहात आवाज उठवत असतात. काँग्रेस चा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून विक्रांत चव्हाण यांची ओळख आहे.
ठाणे : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष पदी विक्रांत चव्हाण यांची नियुक्ती केली आहे.
विक्रांत चव्हाण हे ठाणे मनपातील जेष्ठ नगरसेवक असून पालिकेतील काँग्रेस पक्षाचे ते गटनेते आहेत. वेळोवेळी नागरिकांच्या प्रश्नांबाबत ते सभागृहात आवाज उठवत असतात. काँग्रेस चा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून विक्रांत चव्हाण यांची ओळख आहे.
राज्यात आज महाआघाडी चे शासन असून ते उत्तमरीत्या काम करत आहे. काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरात बूथ स्थरावर पक्षाची बांधणी करणार असून ठाणे शहरात काँग्रेस पक्ष नागरिकांचे प्रश्न घेऊन आवाज उठवणार असल्याचें विक्रांत चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रभारी बी एन संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे
459 total views, 1 views today