बदलापूर पालिकेलाही सात कोटींचा निधी

राज्यशासनकडे केलेल्या भाजपच्या पाठपुराव्याला यश

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील शहरांमधील ‘करोना’च्या वाढत्या संसर्गामुळे स्थानिक प्रशासनावर बराच ताण आहे. या आणिबाणीच्या प्रसंगी त्यांना मदत म्हणून राज्य शासनाने ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिकांना ३५ कोटी रूपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. तातडीने तो निधी वितरीतही केला. मात्र बदलापूर पालिकेला या निधीपासून वंचित ठेवले आहे. खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांनी यासंदर्भात तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र व्यवहार केला. बदलापूर शहरातही रुग्णसंख्या वाढत आहे. इथेही पालिका आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कोविड रुग्णालय, विलगीकरण कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे इतर शहरांप्रमाणेच बदलापूरलाही विशेष निधी मिळावा, असे विनंती खासदार पाटील आणि आमदार कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी बदलापूर शहरासाठीही सात कोटीचा स्वतंत्र निधी जाहीर केला आहे. त्यामुळे आता बदलापूरमध्येही करोना प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पुरेसा निधी उपलब्ध झाला आहे.

 528 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.