सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज

खाजगी सचिव, स्वीय सहाय्यक, वाहन चालक, अंगरक्षक यांना ही घरी सोडलं

मुंबई : मागील अकरा दिवसांपासून ते या रुग्णालयात करोनाच्या आजारामुळे दाखल होते . दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले
मुंडे यांच्यासोबत करोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव तसेच आणखी एक स्वीय सहाय्यक दोन वाहन चालक एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सर्वांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली आहे . आता केवळ एक अंगरक्षक व एक कुक हे दोघेच जण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती ही सुधारत आहे

 577 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.