उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या CET परीक्षा पुढे ढकलल्या

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या माध्यमातून  दरवर्षी घेण्यात येणा-या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा सध्या संपूर्ण देशात आणि  महाराष्ट्रात असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा  कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या माध्यमातून  दरवर्षी  उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि  महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती.विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील. असेही  सामंत यांनी संगितले.

 327 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.