कोव्हीड रुग्णालयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते औपचारिक उदघाटन

रूग्णालयात ऑक्सिजन, एक्सरे आणि अतिदक्षता खाटांची व्यवस्था
अंबरनाथ : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या अंबरनाथ येथील कोव्हीड हॉस्पिटलचे अखेर औपचारिक उद्घाटन पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. रुग्णालयात ५०० खाटा, १०० ऑक्सिजन खाटा, एक्स रे मशीन, पॅथॉलॉजी तसेच इतर आवश्यक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध करण्यात आल्या असल्याने रुग्णांना त्याचा लाभ घेता येणार आहे.
अंबरनाथमध्ये कोरोना रुग्णांची संख्या एक हजारच्या पुढे गेली आहे. त्यात आजवर २२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर ३८१ पेक्षा जास्त
रुग्ण बरे देखील झाले आहेत. पॉझीटीव्ह रुग्णांना रुग्णालयात उपचार देण्यासाठी आजवर अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाचे हात तोकडे पडत होते. रुग्णांच्या असुविधांची जाणीव ठेवून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागातील बंद पडलेल्या डेंटल कॉलेज इमारतीमध्ये कोव्हीड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला व अवघ्या महिन्याभरात या ठिकाणी अद्ययावत कोव्हीड रुग्णालय रुग्णाच्या सेवेत रुजू झाले. त्यामुळे आता आंबरनाथमधील रुग्णांना इतर दुसऱ्या शहरात उपचारासाठी जाण्याची गरज भासणार नाही. रुग्णांना आपल्याच शहरात उपचार मिळणार असल्याने रुग्णांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
नुकतेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रुग्णालयाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहर प्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, प्रशासक जगतसिंग गिरासे, मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर, नोडल ओफिअर मेजर डॉ. नितीन राठोड, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज भोसले, डॉ. गणेश राठोड, डॉ. उषा माहेश्वरी, सुभाष साळुंके, आदी मान्यवर उपस्थित होते.
कोव्हीड रुग्णालय उभारण्यासाठी लोकसहभागाचाही मोठा वाटा आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर, प्रशासक जगतसिंग गिरासे, आमदार डॉ बालाजी किणीकर तसेच इतर लोकप्रतिनिधींनी रुग्णालय उभारणीसाठी बरेच परिश्रम घेतले. त्यामुळेच अंबरनाथमध्ये अद्यावत रुग्णालय उभे राहू शकले आहे.
रुग्णालयात ५०० खाटांची व्यवस्था, यात कोविड काळजी केंद्रा अंतर्गत २०० तर इतर कोविड आरोग्य केंद्रासाठी आरक्षित असणार आहेत. यात १०० खाटांना ऑक्सिजनची सुविधा पुरवण्यात आली असून अतिदक्षता विभागात १० आणि ५ व्हेंटीलेटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. लहान मुले आणि महिलांसाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी१५ डॉक्टर, १६ परिचारिका आणि २५ वॉर्डबॉय यांची नेमणूक करण्यात आली आहे. या शिवाय शहरातील अंबरनाथ मेडिकल असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य आपली सेवा या रुग्णालयासाठी देणार आहेत.

 396 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.