शहरातील कोरोनाच्या रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी कालिदास देशमुख यांनी केली प्रशासनाकडे मागणी
बदलापूर : बदलापूर शहरात येत्या ३० जूनपर्यंत लॉकडाऊन अर्थात संचार बंदी लागू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी पालिकेच्या प्रशासकांकडे केली आहे.
बदलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. संचार बंदी शिथिल झाल्यामुळे नागरीक बंधन न पाळता बाहेर पडत आहेत. त्यामुळेच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याला नियंत्रण आणण्यासाठी येत्या ३० जूनपर्यंत संचारबंदी लागू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी प्रशासक जगतसिंग गिरासे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
503 total views, 1 views today