सम्राट अशोक विद्यालयात मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने डिजिटल माध्यमातून योग दिन साजरा
कल्याण : आंतरराष्ट्रीय सहावा योगदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल माध्यमातून अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून सम्राट अशोक विद्यालयात मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी देखील डिजिटल माध्यमातून योग दिन साजरा केला. योग प्रशिक्षक कविता मौर्या यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना म्हटले कोरोनावर औषध अद्याप जगात तयार झालेले नाही कोरोणा रुग्ण बरे होत आहेत त्यांना प्रतिकार शक्ती निर्माण करण्याकरिता औषधोपचार केले जातात मग बरे होतात. आपण योग प्राणायाम योगासने व्यायाम व सकस आहारातून प्रतिकारशक्ती तयार करायची आहे नियमित योगा प्राणायाम करून प्रतिकारशक्ती वाढवू कोरोणा पासुन बचाव करूया यापुढे आपण परिवारासोबत सातत्याने योग साधना करा असे सांगितले.मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्यासोबत सहशिक्षक गणेश पाटील ,संगीता महाजन ,ऊर्मिला साबळे, विद्यार्थी व काही पालकांनी सहभाग घेतला. गणेश पाटील यांनी प्रशिक्षक कविता मौर्या यांचे आभार मानले.
701 total views, 2 views today