आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे केले होते आयोजन
कल्याण : भारतीय जनता पार्टी (प.) आयोजित पतंजलीच्या विशेष सहकार्याने आतंरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कल्याण शहरात विविध २१ ठिकाणी ऑनलाइन योग शिबिर संपन्न झाले. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन योग शिबिराची संकल्पना मांडत शहरातील नागरिकांना आपल्या आपल्या ठिकाणी योग करता आला. व्हिडीओ संवादाच्या माध्यमातून योग शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
योग दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवला तर शरीर निरोगी राहू शकते. आपल्या कुटुंबातील सदस्यांसह योगा करा आणि निरोगी भारत घडविण्याचा संकल्प करा, कोरोनाशी लढण्यासाठी योग साधनेचाही मोठा फायदा आहे, नियमित योग करा असे आवाहन आयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना केले.
यासाठी अमित धाक्रस, बुधाशेठ सरनोबत, निखिल चव्हाण, संजय कारभारी,अनंता पाटील, प्रकाश पाटील,प्रिया शर्मा, प्रशांत माळी, विशाल गायकर, महेश केळकर, बजरंग तांगडकर, राजेश यादव, संतोष शिंगोळे, ज्ञानेश्वर कोट, निलेश विसपुते, नीता दिसले निर्भय मिश्रा, प्रताप टूमकर, स्मिता पाटील, राहुल भोईर, दुष्यंत खैरनार, कल्पेश जोशी, निशिकांत मालविया, अभिषेक सिंग, ज्योती नाईक,रोहित लामतुरे,मयुरेश आगलावे, विजय शिरोडकर व योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या वंदना कल्याणकर आदींनी सहकार्य केले.
521 total views, 3 views today