लॉक डाऊन मध्येही ब्राम्हण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केला योगा दिवस साजरा

मुख्याध्यापकांनी मुलांना सांगितले योगाभ्यासाचे महत्व आणि उपयुक्तता

ठाणे : आज आंतरराष्ट्रीय योग दिन लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. तरीही ब्राह्मण शिक्षण मंडळाचे ब्राह्मण विद्यालय .पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका दामले बाईं व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका वडे बाई यांनी मुलाना व्हाट्सअपद्वारे योगासन करण्याचे फायदे काय असतात ते सांगितले. योगासननामुळे शरीर लवचिक बनते मुलांची उंची वाढण्यास मदत होते श्वसनक्षमता सुधारते. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत होते. पचनाचे विकार दूर होतात आदीयोगासनांची उपयुक्त माहिती सांगितली. त्यानंतर मुलांनी काही सोपी आसने त्यांच्या घरीच करून त्याचे फोटो पाठवले आहेत.

 368 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.