ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती सुभाष पवार यांच्याकडे धनादेश केला सुपूर्द

ठाणे : संपुर्ण जगावर आज कोरोनाचे संकट आलेले आहे.महाराष्ट्र सुद्धा  या  वैश्विक महामारीचा कठीण सामना करत असल्याने या कठीण  परिस्थितीत महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदतीची गरज असल्याने ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने महाराष्ट्र शासनास एक हात मदतीचा म्हणून एक लाख रुपयांची मदत केली आहे. 
   
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिक्षक नेते दिवंगत शिवाजीराव  पाटील यांच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा ठाणे यांच्या सहकार्यातुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १,००,०००( एक लाख रु.)ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सभासद,केंद्रप्रमुख आणि शिक्षकांनी दिला आहे.

शनिवार(२० जून)रोजी ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श
सुभाष पवार यांच्याकडे मुरबाड पंचायत समिती उपसभापती अनिल देसले व जिल्हा परिषद सदस्या तथा शिक्षण समिती सदस्या रेखा कंटे ,जेष्ठ नेते रामभाऊ दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा संघाचे नेते जयवंत  मुरबाडे, जिल्हाध्यक्ष भगवान भगत,जिल्हा सरचिटणीस वसंत पडवळ,पतपेढी संचालक राजेंद्र सापळे,पदवीधर जिल्हाध्यक्ष गणेश रिकामे आदींनी सुपुर्द केला.
  
यावेळी गव्हर्नमेंट सर्व्हंट्स पतपेढी संचालिका कांचन चौधरी,रंजना डोहळे,शुभांगी पवार,विकास भोईर,रविंद्र घरत,दिपक पाटोळे,तानाजी जाधव,रघुनाथ ईसामे,अशोक सोनावणे,सोमनाथ सुरोशे,काशिनाथ राऊत,हनुमंत मोहपे,सुनिल देशमुख,भरत  भांडे,सोपान गोल्हे,रविंद्र मोहपे,शैलेश ईसामे,संतोष  डोंगरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शैलेश ईसामे तर वसंत पडवळ यांनी  आभार  व्यक्त  केला.

 490 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.