कोरोना योद्धयांसाठी कोपरी ब्लॉक कॉंग्रेसच्यावतीने राहुल गांधीच्या वाढदिवशी आयोजित केला उपक्रम
ठाणे : ठाण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा अविरत प्रयत्न करीत आहे.या पाश्र्वभूमीवर अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या सूचनेनुसार ठाणे शहर (जिल्हा) कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे व कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस कृष्णा भूजबळ यांनी कोरोना लढयात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कोपरी केंद्रातील अग्निशमन कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर आणि अर्सनीक अल्बम या रोगप्रतिकारकारक होमीओपथीक गोळयांचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी राहुल गांधी यांना दिर्घायुष्य लाभावे अशा शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाकरिता कोपरी ब्लॉकचे इसमा मुद्दीन शेख संजय यादव विजय पवार मनोज जाधव,सचिन कुटे, जयप्रकाश वैद्य व ब्लॉक पदाधिकारी उपस्थित होते
630 total views, 1 views today