केडीएमसीच्या हद्दीतील कोरोना मुळे मृत पावलेल्या ६४ व्यक्तींचे डेट ऑडीट रिपोर्ट द्या

केडीएमसीच्या हद्दीतील कोरोना मुळे मृत पावलेल्या ६४ व्यक्तींचे डेट ऑडीट रिपोर्ट द्या

    भाजप गटनेते शैलेश धात्रक यांची मागणी

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत दिवसेंदिवस कोरोना पाॅझीटिव्ह रुग्णाची संख्या वाढत आहे. तर आतापर्यत ६४ व्यक्ती मृत पावल्या आहेत.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू लागले आहे.पालिका प्रशासन रुग्णांना सेवा देण्यास कमी पडत असून केडीएमसीच्या हद्दीतील कोरोना आजाराने मृत पावलेल्या ६४ व्यक्तींचे डेट ऑडीट रिपोर्ट द्या अशी मागणी भाजप गटनेते शैलेश धात्रक यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. तर शहरात कोरोनाबाधितांची संख्या का वाढत आहे , यात काही गौडबंगाल तर नाही ना असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

 भाजप गटनेते शैलेश धात्रक यांनी पत्रात म्हणले आहे कि, पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कोरीनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची अवस्था वाईट आहे. या रुग्णालयात डॉक्टर्सची कमतरता असून व्हेंटीलेटर, महागडी इंजेक्शन,संबंधित आजाराची पुरेश्या औषधांबाबत कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने आजपर्यत मृतांचे प्रमाण जास्त आहे.रुग्णांचा जीव वाचला म्हणून रुग्णालयात पुरेसे ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटरची व्यवस्था करण्यात यावी.लॉकडाऊन सुरु झाल्यापासून कोविड-१९ या साथीच्या रोगावर किंवा त्याच्याशी संबंधित कोणकोणत्या प्रकारच्या खर्च केला आहे, त्याबाबतची संपूर्ण माहिती सर्व नगरसेवकांना देण्यात यावी. लॉकडाऊनच्या सुरुवातीला शहरात जंतुनाशक औषध फवारणी केली जायची ,आता मात्र फवारणी होत नाही.जंतुनाशक औषध संपले असल्यास आपल्या विशेष निधीतून हे औषध विकत घ्यावे आणि शहरात जंतुनाशक औषध फवारणी करण्यात यावी.ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात देखील महापालिका रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या नागरिकांना पूर्णतः मोफत उपचार मिळेल अशी व्यवस्था करावी. तसेच अनेक कोविड-१९ रुग्णालयात रुग्णांकडून प्रतिदिन ६ हजार रुपये बेड चार्जेस आकारले जातात याचाही पालिकने विचार करावा.पुरेसा मेडिकल स्टाफ , तज्ञ डॉक्टर्स, पुरेशी ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर व्यवस्था या आजारासाठी लागणारी पुरेशी औषधे आणि इंजेक्शन याची व्यवस्था करूनच नव्याने कोरोना केंद्र सुरु करावे, १८ जून पर्यत पालिका हद्दीत कोरोना आजाराने मृत्यू पावलेल्या ६४ व्यक्तींचे डेट ऑडीट रिपोर्ट द्या.सदरचे ऑडीट करण्यासंदर्भात पालिकेने डेट ऑडीट कमिटीचे गठन केले आहे का ? गठन केले असल्यास कमिटीमध्ये कोणकोणत्या सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे , त्या सदस्यांची नावे व  पदनाम निहाय यादी मिळावी.तसेच सदर कमिटी गठन केली नसल्यास ती का करण्यात आली नाही याची देखील माहिती द्यावी. डेट ऑडीट रिपोर्टमध्ये रुग्णाचे नाव, वय, पत्ता, लिंग, रुग्णालयात दाखल केल्याची तारीख,निधन झाल्याची तारीख,मृत रुग्णाच्या नातेवाईकांची नाव,त्यांचा मोबाइल नंबर, रुग्णालयाचे नाव, रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरचे नाव, पत्ता,त्यांचे शिक्षण, रुग्णावर केलेले दैनंदिन उपचाराची माहिती, रुग्णाच्या नातेवाईकांना किती बिल आकारले,मृत पावलेल्या रुग्णाचा मृत्यु दाखल्यावर मृत्यूचे काय काय नमूद केले आहे, याची संपूर्ण माहिती देण्यात यावी. एखाद्या व्यक्तीची तपासणी केल्यानंतर रिपोर्ट २४ तासात रुग्णाला मिळावा.डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोडवरील पालिकेच्या ओपीडी सेंटरमध्ये त्वरित आवश्यक स्टाफ नेमण्यात या वअश्या अनेक मागणी धात्रक यांनी केल्या आहेत. अपुरी सुविधा आणि निष्काजीपणाची सेवा देऊ केल्यास पालिका प्रशासनाच्या विरोधात जनआंदोलन करू असा इशाराही  धात्रक यांनी पत्राद्वारे दिला आहे.

 583 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.