डोंबिवलीच्या ज्योती चौहान प्रथम

ऑनलाईन राष्ट्रीय पातळीवरील बुद्धा संगीत स्पर्धा २०२०

डोंबिवली : बुद्धा संगीत स्पर्धा २०२० मध्ये डोंबिवलीची ज्योती चौहान यांनी पप्रथम क्रमांक पटकाविला आहे. नगमा द्वारा नुकतीच ऑनलाईन राष्ट्रीय पातळीवर ‘बुद्धा संगीत स्पर्धेचे ‘आयोजन करण्यात आले होते. तीन राऊंड द्वारा डोंबिवलीच्या ज्योती चौहान यांनी प्रथम क्रमांक पटकावला.प्रथम क्रमांकास १५ हजार रोख बक्षीस सोबत अनेक आकर्षक बक्षीस ही जाहीर करण्यात आले. ज्योतीने नगमा प्रेसेन्ट्स तसेच आईआरएस व संगीत दिग्दर्शक राजेश ढाबरे यांचे आभार व्यक्त केले. ज्योती चौहान ह्या मराठी,हिंदी,गुजराती,पंजाबी भाषेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्धांचे गीत सादरीकरण करीत असतात. तसेच आजपर्यंत विविध भाषेमध्ये गीत रेकॉर्डिंगस केले आहेत. लहानपणापासूनच संगीताची रुची असलेल्या ज्योतीला योग्य मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत.अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये संगीत क्षेत्रात करियर करण्यासाठी धडपडत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून संगीताचे धडे गिरवत आहे.

 503 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.