भाताच्या जोडीला यंदा तूर

३ हजार २८० हेक्टर क्षेत्रात होणार लागवड

ठाणे : ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भातपीक घेतले जात असले तरी यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणाात तुरीचीही लागवड करण्यात आली आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यात भाताला पूरक असे बांधावरील पीक म्हणून तूर लागवडीचा प्रयोग यापूर्वीही करण्यात आला आहे. मात्र यंदा मोठ्या प्रमाणात तूर लागवड करण्यात आली आहे. कृषि विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यात एकुण ४१ क्विंटल तूर बियाणांचे वाटप करण्यात आले असून तब्बल ३ हजार २८० हेक्टर जमिनीवर त्याची लागवड करण्यात आली आहे.
तूर लागवडीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह््यात ठिकठिकाणी १८ शेतीशाळा घेण्यात येत आहेत. तुरीच्या पिकामुळे जिल्ह््यातील शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वाास जिल्हा कृषि अधिक्षक अंकुश माने यांनी दिली.
करोना संकट काळात शहरातील नागरिकांप्रमाणेच शेतकरीही घरात अडकून पडले होते. मात्र पावसाची चाहूल लागताच त्यांनी करोनाची भीती झुगारून देत शेता वावरात काम करण्यास सुरूवात केली. अंबरनाथ, मुरबाड, कल्याण आदी तालुक्यातील बहुतेक शेतकरी भात पिक घेतात. यंदा कृषि विभागाने त्यांना तूर लागवड करण्यास प्रोत्साहित केले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात बियाणेही उपलब्ध करून दिले आहे.
तूर पिकाच्या पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांना शेतीशाळेच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. एकात्मिक कीड रोग नियंत्रण, मित्र-शत्रू कीड ओळख आदींविषयी शेतकऱ्यांना शेतीशाळेत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. उत्पादनात करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचे कृषि सहाय्यक सचिन थोरवे यांनी सांगितले. मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनीही कृषि विभागाच्या मार्गदर्शन वर्गांना हजेरी लावत शेतकऱ्यांना तूर लागवडीसाठी प्रोत्साहीत केले.

 510 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.