दलित अत्याचार; कारवाई न केल्यास जमावबंदी मोडून आंदोलन छेडणार

वंचित बहुजन आघाडीचा इशारा
ठाणे : लॉकडाऊनच्या काळात राज्यभर दलित अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये सरकारने तत्काळ कारवाई करावी; अन्यथा, जमावबंदी आदेश मोडून उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. या संदर्भातील निवेदन ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांनी दिले.
वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या निवेदनुसार, नागपूर येथे अरविंद बनसोडे (रा- पिपळधरा ता- नरखेड, जि- नागपूर) याची २७ मे रोजी जातीयवाद्यांनी भर रस्त्यात हत्या केली. पुणे जिल्ह्यात घडली आहे. विराज जगताप (रा- पिंपळे सौदागर, जि- पुणे) या बौद्ध तरुणावर ६ ते ७ जातीयवाद्यांनी हल्ला केला. त्यात तो तरुण मरण पावला. तिसर्या घटनेत दगडू धर्मा सोनवणे (रा- महिंदळे ता. भडगाव, जि. जळगाव) या बौद्ध इसमाच्या घरावर ७ जून रोजी जातीयवाद्यांनी हल्ला केला. पाचव्या घटनेत राहुल अडसूळ या कोरेगाव, ता.कर्जत, जि.अहमदनगर येथील तरुणावर गावातील लोकांनी मिळून हल्ला केला. बीड जिल्ह्यातील पारधी समाजाचे तिहेरी हत्याकांड नुकतेच महाराष्ट्रभर गाजले आहे. हा प्रकार जातीयवाद्यांकडूनच घडलेला आहे. चंदनापुरी खुर्दी, ता. अंबगड, जि. जालना येथे बौद्ध परिवाराला २०-२५ जणांच्या टोळीने मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली. मंठा, जि. जालना येथील दलित शिक्षकाला गावातील उच्चवर्णीयाकडून केल्या जाणार्या शिवीगाळाला, मारहाणीला कटांळून त्यांना आत्महत्या करायला भाग पाडण्याची सातवी घटना घडली आहे. तर, निळा. ता.सोनपेठ, जि. परभणी या गावातील बौद्ध महिला संरपचांना गावातील बौद्ध कुटुंबांना कोरोना काळात गावातील शाळेत क्वारंटाईने केले म्हणून मारहाण करण्यात आली. तसेच, ठाण्यातील जळीत कांडातील दलितांचे अद्याप पुन:र्वसन करण्यात आलेले नाही. या सर्व घटना जातीय मानसिकतेमधून झालेल्या आहेत. या जातीयवादी प्रवृत्तींवर तत्काळ कठोर कारवाई करावी, जलदगती न्यायालयातून न्यायादान करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणात कारवाई न झाल्यास जमावबंदी मोडीत काढून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर जयंवत बैले, अमोल पाईकराव, प्रविण पाईकराव, अनिवाश कांबळे, राजू चौरे आदींच्या सह्या आहेत.

 360 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.