सांडपाण्यातून फळबागेचा करिष्मा


कडवेतील शेतकरी महादेव कदम यांची किमया

मुंबई : पाणी अडवा, पाणी जिरवा असे सरकारकडून सातत्याने सांगण्यात येते, प्रत्यक्षात मात्र क्वचितच या याचे पालन होताना दिसते. पण सातारा, पाटण, कडवे येथील महादेव शिवाजी कदम या शेतकर्‍याने सांडपाण्यातून फळबाग तयार करण्याचा करिष्मा करून दाखवला आहे. आंघोळी व भांडी घासण्याच्या पाण्यातून त्यांनी दीड गुंठ्यात फळबाग फुलवली आहे.

पाच ते सहा वर्षांपूर्वी जी जागा पडीक होती, त्या जागेवर महादेव शिवाजी कदम यांनी फळबाग फुलवण्याची करामत करून दाखवली. त्यांच्या गावी पाण्याची समस्या आहे. दिवसाला केवळ अर्धा तासच पाणी येते. त्यामुळे तिथे शेती करणे अवघड असते. यावर उपाय म्हणून त्यांनी आंघोळी व भांडी घासण्याच्या पाण्यातून फळबाग फुलवण्याची योजना आखली.

कमी जागेत जादा उत्पन्न
कमी जागेत जास्त उत्पन्न मिळवणारे ते या गावातील एकमेव शेतकरी आहेत. आपली पत्नी नंदा हिच्यासोबत ते शेतीची कामे करतात. या बागेत नारळ, आंबा, चिक्कू, फणस, रामफळ, पपई, सीताफळ, बदामाची झाडे, केळी, पेरू, शेवला, लिंबू, इडलिंबू, वांगी, टोमॅटो, मिरची, कडीपत्ता यांची लागवड केली जाते.
गावीच विकला जातो माल
छोट्या जागेत ही बाग असल्यामुळे फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड होत नाही. त्यामुळे जे पिकते ते गावच्याच लोकांना विकले जाते.   ही प्रकिया दैनंदिन होत असते. मात्र पडीक जागेतून चांगले उत्पन्न कमवण्याची शक्कल महादेव कदम यांनी काढल्यामुळे इतरांसमोरही आदर्श उभा राहिला आहे.

 379 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.