औद्योगिक आस्थपनाच्या सामाजिक दायित्व निधीतील रुग्णवाहिकांसाठी शिवसेनेचा पुढाकार
मुंबई : शिवसेनेच्या पुढाकारातून ८५ रूग्णवाहिका नागरीकांच्या सेवेत येणार असून यातील पहिल्या टप्प्यामधील २४ रूग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पार पडला.
राज्याचे पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने ५५ रूग्णवाहिका सामाजिक दायित्वच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला देण्यात येत आहे. यातील १२ रूग्णवाहिका महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यासाठी झी समूह, महिंद्रा अँड महिंद्रा , दिपक फर्टिलायझर, आनंद राठी यांचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकराने मुंबई आणि ठाणे या शहरांसाठी ३० रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहे. यापैकी ५ रूग्णवाहिका आयसीयु व व्हेंटीलेटर या सुविधांनी सुसज्ज आहेत.
450 total views, 1 views today