अंबरनाथमध्ये अंधांना धान्य वाटप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबवला उपक्रम
अंबरनाथ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे अंबरनाथ शहराच्यावतीने शहराध्यक्ष कुणाल सुभाष भोईर यांच्याकडून अंबरनाथमधील सुमारे ५५ अंध बांधवांच्या कुटूंबियांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
मनसे नगरसेविका अपर्णा भोईर यांच्या पुढाकाराने निर्माण करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात सुरक्षित अंतर राखून अंध बांधवाना धान्य वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्याकडून अंबरनाथ नगरपालिकेच्या कोव्हिड सेंटर मधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुमारे १२० पीपीई किट व मास्क हे राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आले. सदर पीपीई किट व मास्क मनसे शहराध्यक्ष कुणाल सुभाष भोईर यांनी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर यांच्या ताब्यात दिले.
याप्रसंगी जिल्हा संघटक संदीप लकडे मनविसे अंबरनाथ शहराध्यक्ष धनंजय गुरव, मंदार दिघे, अविनाश सुरसे, योगेश भोईर, जपेश भोईर, स्वप्नील शेडगे, अंकित कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 590 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.