राज्य सरकारच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेनेही आदेश काढावा

घरपोच वृत्तपत्र सेवा देण्यासाठी ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे ठाणे महापालिकेला साकडे

ठाणे : घरपोच वृत्तपत्र वितरणास राज्य  सरकारची परवानगी आहे. असे असताना सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र वृत्तपत्र विक्रेत्यांना सोसायटी मध्ये प्रवेश नाकारला आहे.ठाण्यामध्ये जवळ ८० टक्के सोसायटीने सोसायटीमध्ये वृत्तपत्र देण्याची परवानगी न देता फक्त बिल्डिंग खाली सिक्युरिटी कडे पेपर ठेवण्याची परवानगी दिलेली आहे,पण खाली पेपर ठेवले तर बऱ्याच लोकांचे हात त्याला लागतात त्यामुळे ग्राहक पेपर घेत नाहीत, घरपोच चालू झाल्यावरच घेऊ असे ग्राहक सांगत आहेत. त्यामुळे ठाण्यात अजूनही लोकांची मागणी असूनही वृत्तपत्र त्यांना घरपोच मिळत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घरपोच वृत्तपत्र देण्यासाठी आदेश काढला की ७ जून पासून घरपोच पेपर मिळतील परंतु मुख्यमंत्री यांनी आदेश देऊनही त्यांच्या आदेशाचे पालन ठाण्यात होताना दिसत नाही यावर ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन ने खेद व्यक्त केला आहे आणि ठाणे महानगरपालिका आयुक्तांना याबाबत स्थानिक पातळीवरही घरपोच वृत्तपत्र वितरण याबाबत आदेश काढावा असं पत्र आज  ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन कडून देण्यात आले असे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी सांगितले.

 475 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.