दिलासा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते आयोजन
डोंबिवली : कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून डोंबिवलीत दिलासा फाउंडेशनच्या वतीने सुमित्रा भोईर क्लिनिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे १०० रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या. या शिबिरात रक्तदात्यांना सर्टिफिकेट देण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शिबिरात रक्तदान केले जात होते. शिबीरात शैलेंद्र भोईर यांसह अनेकांनी अथक मेहनत घेतली.शिबिरात आलेल्या सर्वाना हाताला सॅनेटराईझ लावल्यावरच प्रवेश दिला जात होता.डोंबिवलीत अश्या प्रकारे विविध संस्था आणि फाउंडेशन रक्तदान शिबीर भरवून आपले कर्तव्य बजावीत आहेत.
561 total views, 1 views today